रायगड जिल्ह्याचा निकाल ८६.८७ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 01:23 AM2018-05-31T01:23:31+5:302018-05-31T01:23:31+5:30

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेत रायगड जिल्ह्यातील ८६.८७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत

Raigad district results in 86.87 percent | रायगड जिल्ह्याचा निकाल ८६.८७ टक्के

रायगड जिल्ह्याचा निकाल ८६.८७ टक्के

googlenewsNext

अलिबाग : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेत रायगड जिल्ह्यातील ८६.८७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. बारावीच्या परीक्षेला ३२ हजार ९२९ विद्यार्थी बसले होते. पैकी २७ हजार ६५७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदाही बारावीच्या परीक्षेत मुलींनी बाजी मारली आहे. ९२.२६ टक्के मुली तर ८२.१५ टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत.
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दुपारी एक वाजता आॅनलाइन निकाल जाहीर केला. परंतु इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने इंटरनेटचा वेग मात्र घसरला होता.परिणामी निकाल मिळण्यासाठी विद्यार्थ्यांना उशीर होत होता. त्यामुळे विद्यार्थ्यांची चांगलीच धाकधूक वाढल्याचे दिसून आले.
धीम्या इंटरनेट गतीचा फटका रायगड जिल्ह्याच्या माध्यमिक विभागाला देखील बसला. त्यांच्या कार्यालयातीलही फोन सातत्याने खणखणत होते, मात्र
त्यांच्याकडेही माहिती उपलब्ध नसल्याने खोळंबा होत होता. दुपारी ४ वाजता शिक्षण विभागाने अधिकृत निकालाबाबतची माहिती जाहीर केली.

बारावी परीक्षेत जिल्ह्यातील शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात देखील मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण अधिक अधिक आहे. रायगड जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रातील तळा तालुक्याने ९५.५७ टक्के उत्तीर्ण प्रमाण साध्य करुन जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे.

सिद्धार्थ पेटारे यास गणितात १०० पैकी १००
अलिबाग : तालुक्यातील आरसीएफ स्कूलचा विद्यार्थी सिद्धार्थ मंगेश पेटारे याने ९३.८६ टक्के गुण मिळवून तो शाळेत पहिला आला आहे. गणित विषयामध्ये १00 पैकी १00 गुण मिळवून त्याने सुवर्ण पदकावर शिक्कामोर्तब केले आहे. त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

नांदगाव कनिष्ठ महाविद्यालयाचा
निकाल ६८ टक्के
मुरु ड जंजिरा : श्री छत्रपती शिवाजी नूतन विद्यालय कनिष्ठ महाविद्यालयाच्या कला शाखेसाठी एकंदर ८८ विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते.त्यापैकी ६0 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या शाळेचा निकाल ६८.१८ टक्के लागला आहे. या विद्यालयामधून समीक्षा दत्तात्रेय नाकती हिने ६७.८४ टक्के मिळून प्रथम, मनस्वी विनोद राऊत हिने ६५.२३ टक्के गुण मिळवून द्वितीय तर तेजल गोपाळ गुंड हिला ६३.५३ टक्के गुण मिळवून तृतीय आली आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अध्यक्ष फैरोज घलटे व मुख्याध्यापक चिंतामणी जोशी व संचालक मंडळ यांनी अभिनंदन केले आहे.

पाली विज्ञान शाखेचा निकाल ९६.२३ टक्के
पाली : पाली येथील वडेर हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेचा निकाल ९६.२३ टक्के लागला आहे. एकूण १७९ विद्यार्थ्यांपैकी ५ विशेष प्रावीण्य, ५० प्रथम श्रेणी, १२२ द्वितीय श्रेणी तर २ उत्तीर्ण श्रेणीत यशस्वी झाले आहेत. कला शाखेचा निकाल ६४.३७ टक्के लागला असून एकूण ७४ विद्यार्थ्यांपैकी एक विशेष गुणवत्ता, ६ प्रथम श्रेणी,६० द्वितीय श्रेणी, तर ७ उत्तीर्ण श्रेणीत यशस्वी झाले आहेत. तीनही शाखांमधून ४७४ उत्तीर्ण झाले. तीनही शाखांचा एकूण निकाल ८६.५७ टक्के लागला आहे.

नवयुग ज्यु. कॉलेजची उज्ज्वल यशाची परंपरा कायम
महाड : नवयुग विद्यापीठ ट्रस्टच्या नवयुग ज्युनियर कॉलेजचा वेदांत जोशी ८३.५९ टक्के गुण मिळवून नवयुगमधून प्रथम आला आहे. कॉलेजच्या वाणिज्य शाखेचा निकाल ९२.५९ टक्के ,शास्त्र विभागाचा निकाल ८५.५७ टक्के लागला आहे. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अ‍ॅड. विजयसिंह जाधवराव, अध्यक्ष अ‍ॅड. रणजितसिंह जाधवराव, कार्यकारी विश्वस्त विजयानंदा जाधवराव, मुख्य कार्यकारी अधिकारी संग्रामसिंह जाधवराव, मुख्याध्यापक मनोहर पाटील तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

विज्ञान विभागाचा
निकाल ९५.३९ टक्के
१बारावी विज्ञान विभागाचा निकाल हा सर्वाधिक ९५.३९ टक्के लागला आहे. १० हजार ७९७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. पैकी १० हजार २९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यात ६९९ विद्यार्थ्यांना विशेष श्रेणी, तीन हजार २२५ विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी, पाच हजार ९३९ विद्यार्थ्यांना द्वितीय श्रेणी तर ४३६ विद्यार्थ्यांना उत्तीर्ण श्रेणी प्राप्त झाली आहे.
कला शाखेचा
निकाल ७१.४४ टक्के
२कला शाखेत आठ हजार २२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यातील पाच हजार ७३१ म्हणजे ७१.४४ विद्यार्थी पास झाले. ६९ विद्यार्थ्यांना विशेष श्रेणी, ८६३ विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी, तीन हजार ९३५ विद्यार्थ्यांना द्वितीय श्रेणी तर ८६४ विद्यार्थ्यांना उत्तीर्ण श्रेणी प्राप्त झाली आहे.
वाणिज्य शाखेचा
निकाल ८९.७५ टक्के
३वाणिज्य शाखेतून ११ हजार ६४६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. पैकी ८९.७५ टक्के म्हणजे १० हजार ४५२ विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. ७१२ विद्यार्थ्यांना विशेष श्रेणी, तीन हजार १६५ विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी, पाच हजार ५८७ विद्यार्थ्यांना द्वितीय श्रेणी तर ९८८ विद्यार्थ्यांना उत्तीर्ण श्रेणी प्राप्त झाली आहे.
कौशल्य विकास शाखेचा निकाल ८४.६३ टक्के
४कौशल्य विकास(व्होकेशनल) शाखेतून ७८७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. पैकी ८४.६३ टक्के म्हणजे ६६६ विद्यार्थी पास झाले. १९ विद्यार्थ्यांना विशेष श्रेणी, २४२ विद्यार्थी प्रथम श्रेणी, ३८८ विद्यार्थी द्वितीय श्रेणी तर १७ विद्यार्थ्यांना उत्तीर्ण श्रेणी प्राप्त झाली.

Web Title: Raigad district results in 86.87 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.