शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
2
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
3
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
4
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
5
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
6
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
7
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
8
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
9
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
10
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
11
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
12
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
13
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
14
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
15
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
16
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
17
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
18
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
19
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
20
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय

रायगड जिल्ह्याचा निकाल ८६.८७ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 1:23 AM

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेत रायगड जिल्ह्यातील ८६.८७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत

अलिबाग : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेत रायगड जिल्ह्यातील ८६.८७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. बारावीच्या परीक्षेला ३२ हजार ९२९ विद्यार्थी बसले होते. पैकी २७ हजार ६५७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदाही बारावीच्या परीक्षेत मुलींनी बाजी मारली आहे. ९२.२६ टक्के मुली तर ८२.१५ टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत.राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दुपारी एक वाजता आॅनलाइन निकाल जाहीर केला. परंतु इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने इंटरनेटचा वेग मात्र घसरला होता.परिणामी निकाल मिळण्यासाठी विद्यार्थ्यांना उशीर होत होता. त्यामुळे विद्यार्थ्यांची चांगलीच धाकधूक वाढल्याचे दिसून आले.धीम्या इंटरनेट गतीचा फटका रायगड जिल्ह्याच्या माध्यमिक विभागाला देखील बसला. त्यांच्या कार्यालयातीलही फोन सातत्याने खणखणत होते, मात्रत्यांच्याकडेही माहिती उपलब्ध नसल्याने खोळंबा होत होता. दुपारी ४ वाजता शिक्षण विभागाने अधिकृत निकालाबाबतची माहिती जाहीर केली.बारावी परीक्षेत जिल्ह्यातील शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात देखील मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण अधिक अधिक आहे. रायगड जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रातील तळा तालुक्याने ९५.५७ टक्के उत्तीर्ण प्रमाण साध्य करुन जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे.सिद्धार्थ पेटारे यास गणितात १०० पैकी १००अलिबाग : तालुक्यातील आरसीएफ स्कूलचा विद्यार्थी सिद्धार्थ मंगेश पेटारे याने ९३.८६ टक्के गुण मिळवून तो शाळेत पहिला आला आहे. गणित विषयामध्ये १00 पैकी १00 गुण मिळवून त्याने सुवर्ण पदकावर शिक्कामोर्तब केले आहे. त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.नांदगाव कनिष्ठ महाविद्यालयाचानिकाल ६८ टक्केमुरु ड जंजिरा : श्री छत्रपती शिवाजी नूतन विद्यालय कनिष्ठ महाविद्यालयाच्या कला शाखेसाठी एकंदर ८८ विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते.त्यापैकी ६0 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या शाळेचा निकाल ६८.१८ टक्के लागला आहे. या विद्यालयामधून समीक्षा दत्तात्रेय नाकती हिने ६७.८४ टक्के मिळून प्रथम, मनस्वी विनोद राऊत हिने ६५.२३ टक्के गुण मिळवून द्वितीय तर तेजल गोपाळ गुंड हिला ६३.५३ टक्के गुण मिळवून तृतीय आली आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अध्यक्ष फैरोज घलटे व मुख्याध्यापक चिंतामणी जोशी व संचालक मंडळ यांनी अभिनंदन केले आहे.पाली विज्ञान शाखेचा निकाल ९६.२३ टक्केपाली : पाली येथील वडेर हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेचा निकाल ९६.२३ टक्के लागला आहे. एकूण १७९ विद्यार्थ्यांपैकी ५ विशेष प्रावीण्य, ५० प्रथम श्रेणी, १२२ द्वितीय श्रेणी तर २ उत्तीर्ण श्रेणीत यशस्वी झाले आहेत. कला शाखेचा निकाल ६४.३७ टक्के लागला असून एकूण ७४ विद्यार्थ्यांपैकी एक विशेष गुणवत्ता, ६ प्रथम श्रेणी,६० द्वितीय श्रेणी, तर ७ उत्तीर्ण श्रेणीत यशस्वी झाले आहेत. तीनही शाखांमधून ४७४ उत्तीर्ण झाले. तीनही शाखांचा एकूण निकाल ८६.५७ टक्के लागला आहे.नवयुग ज्यु. कॉलेजची उज्ज्वल यशाची परंपरा कायममहाड : नवयुग विद्यापीठ ट्रस्टच्या नवयुग ज्युनियर कॉलेजचा वेदांत जोशी ८३.५९ टक्के गुण मिळवून नवयुगमधून प्रथम आला आहे. कॉलेजच्या वाणिज्य शाखेचा निकाल ९२.५९ टक्के ,शास्त्र विभागाचा निकाल ८५.५७ टक्के लागला आहे. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अ‍ॅड. विजयसिंह जाधवराव, अध्यक्ष अ‍ॅड. रणजितसिंह जाधवराव, कार्यकारी विश्वस्त विजयानंदा जाधवराव, मुख्य कार्यकारी अधिकारी संग्रामसिंह जाधवराव, मुख्याध्यापक मनोहर पाटील तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.विज्ञान विभागाचानिकाल ९५.३९ टक्के१बारावी विज्ञान विभागाचा निकाल हा सर्वाधिक ९५.३९ टक्के लागला आहे. १० हजार ७९७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. पैकी १० हजार २९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यात ६९९ विद्यार्थ्यांना विशेष श्रेणी, तीन हजार २२५ विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी, पाच हजार ९३९ विद्यार्थ्यांना द्वितीय श्रेणी तर ४३६ विद्यार्थ्यांना उत्तीर्ण श्रेणी प्राप्त झाली आहे.कला शाखेचानिकाल ७१.४४ टक्के२कला शाखेत आठ हजार २२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यातील पाच हजार ७३१ म्हणजे ७१.४४ विद्यार्थी पास झाले. ६९ विद्यार्थ्यांना विशेष श्रेणी, ८६३ विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी, तीन हजार ९३५ विद्यार्थ्यांना द्वितीय श्रेणी तर ८६४ विद्यार्थ्यांना उत्तीर्ण श्रेणी प्राप्त झाली आहे.वाणिज्य शाखेचानिकाल ८९.७५ टक्के३वाणिज्य शाखेतून ११ हजार ६४६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. पैकी ८९.७५ टक्के म्हणजे १० हजार ४५२ विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. ७१२ विद्यार्थ्यांना विशेष श्रेणी, तीन हजार १६५ विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी, पाच हजार ५८७ विद्यार्थ्यांना द्वितीय श्रेणी तर ९८८ विद्यार्थ्यांना उत्तीर्ण श्रेणी प्राप्त झाली आहे.कौशल्य विकास शाखेचा निकाल ८४.६३ टक्के४कौशल्य विकास(व्होकेशनल) शाखेतून ७८७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. पैकी ८४.६३ टक्के म्हणजे ६६६ विद्यार्थी पास झाले. १९ विद्यार्थ्यांना विशेष श्रेणी, २४२ विद्यार्थी प्रथम श्रेणी, ३८८ विद्यार्थी द्वितीय श्रेणी तर १७ विद्यार्थ्यांना उत्तीर्ण श्रेणी प्राप्त झाली.