रायगड जिल्हा स्वयंपूर्ण करायचा आहे - रवींद्र चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 02:31 AM2018-03-23T02:31:25+5:302018-03-23T02:31:25+5:30
शेती व इतर क्षेत्राचा विकास करून त्या विकासाच्या माध्यमातून आपला रायगड जिल्हा स्वयंपूर्ण करायचा आहे, त्यासाठी अधिकाऱ्यांनी मिशन मोडवर काम करावे, असे आवाहन रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी गुरु वारी खांदेश्वर येथे केले.
पनवेल : शेती व इतर क्षेत्राचा विकास करून त्या विकासाच्या माध्यमातून आपला रायगड जिल्हा स्वयंपूर्ण करायचा आहे, त्यासाठी अधिकाऱ्यांनी मिशन मोडवर काम करावे, असे आवाहन रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी गुरु वारी खांदेश्वर येथे केले. कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, रायगड जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने खांदेश्वर रेल्वे स्थानकाजवळील मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या रायगड कृषी महोत्सव २०१८ व महिला बचत गट उत्पादने विक्र ी प्रदर्शनाचे उद्घाटन रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी रवींद्र चव्हाण यांनी रायगडवासीय अनेक योजनांपासून वंचित आहेत, रायगडकरांचे स्वप्न साकार करण्यासाठी त्या योजना देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगून पालकमंत्री म्हणून जबाबदारी मोठी आहे, त्यामुळे रायगडवासीयांच्या प्रगतीसाठी काहीतरी करायला हवे यासाठी प्रयत्नशील असून जिल्ह्याच्या प्रगतीसाठी वेळ पडल्यास कटू निर्णय घेण्याचे संकेतही त्यांनी दिले. गावांमध्ये फेब्रुवारीनंतर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होतो, त्यामुळे गावांचे शहरांकडे स्थलांतर होते, ते प्रमाण कमी करण्यासाठी व गावांमध्ये समृद्धी आणण्यासाठी जिल्ह्याचे योग्य व्यवस्थापन होणे गरजेचे आहे, असे सांगतानाच अधिकाºयांनी लोकांशी संपर्कवाढवावा तसेच कामाचे टार्गेट ठेवून कृती आराखडा तयार करावा आणि वेळच्यावेळी कामे पूर्ण करावीत, अशा सूचनाही चव्हाण यांनी अधिकाºयांना दिल्या.
या कार्यक्र मासाठी भाजपाचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, रायगडचे जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी, माजी आमदार देवेंद्र साटम, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे, उपाध्यक्ष आस्वाद पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, प्रांताधिकारी दत्तात्रेय नवले, तहसीलदार दीपक आकडे, भाजपाचे शहर अध्यक्ष जयंत पगडे, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकर आदींसह शेतकरी, नागरिक उपस्थित होते.