रायगड जिल्ह्यात कचऱ्याचा भस्मासुर, दुर्गंधीने नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 12:30 AM2019-11-12T00:30:47+5:302019-11-12T00:30:50+5:30
रायगड जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत जाणाºया कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी ठोस आणि सक्षम यंत्रणा नाही.
आविष्कार देसाई
अलिबाग : रायगड जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत जाणाºया कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी ठोस आणि सक्षम यंत्रणा नाही. गाव आणि शहर स्वच्छ होत असली तरी, दुसरीकडे मात्र ठिकठिकाणी कचऱ्यांचे ढिग जमा होताना दिसत आहेत. सातत्याने साठणाºया कचºयामुळे परिसरांमध्ये पसरणाºया दुर्गंधीने नागरिक त्रस्त झाले आहेत. तसेच नागरिकांच्या आरोग्यावरही त्याचा गंभीर परिणाम होत आहे.
१५ तालुके आणि सुमारे ८०६ ग्रामपंचायती असलेल्या रायगड जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे २७ लाखाच्या आसपास आहे. अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, पाली-सुधागड हे तालुके पर्यटनाच्या दृष्टीने विकसीत होत आहेत. त्याचप्रमाणे याच तालुक्यातील काही ग्रामपंचायतींमध्ये पर्यटकांच्या सोयी सुविधेसाठी कॉटेज उभारण्यात आली आहेत. जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने स्टील, केमीकल, खत निर्मिती यासह अन्य छोटे-मोठ्या उद्योगांचे जाळे उभे राहीले आहे. जिल्हा विकासाच्या वाटेवर असला तरी, जिल्ह्यातील विविध भागांमध्ये रोज निर्माण होणाºया कचºयाची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.
गावांसह शहरांमध्ये दैनंदीन कचरा निर्माण होत आहे. तो उचलण्यासाठी संबंधीत ग्रामपंचायती आणि नगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती आणि महापालिका त्यांच्यामाध्यमातून काम करत आहेत. रोजच्या रोज शहरे गावे ही स्वच्छ केली जातात. मात्र स्वच्छता करता निर्माण होणार कचरा हा अनाधिकृत निर्माण केलेल्या डंपीग ग्राऊंडवर टाकण्यात येत आहे. बहुतांश ग्रामपंचायतींकडे आणि नगरपालिकेकडे स्वत:च्या मालकीचे डंपींग ग्राऊंड नाही शिवाय रोज निर्माण होणाºया कचºयावर प्रक्रीया करण्याची सक्षम यंत्रणाच उपलब्ध नसल्याचे दिसून येते.
कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी कोणत्याच स्तरावरुन विशेष प्रयत्न होताना दिसत नाही. त्यामुळे कचºयाचा भस्मासूर सातत्याने वाढतच चालला आहे. वाढणाºया कचºयामुळे परिसरांमध्ये मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत आहे. अनाधिकृतपणे निर्माण केलेल्या डंपींग ग्राऊंड शेजारुन जाताना नाकाला रुमाल लावूनच जावे लागत असल्याने नागिरकांच्या आरोग्याच्या प्रश्न निर्माण झाला आहे.
आपल्याकडे मोठ्या प्रमाणात कारखानदारी वाढलेली आहे. त्यामध्ये केमीकल वेस्टचेही प्रमाण जास्त आहे. बहुतांश कंपन्यांमार्फत केमीकल वेस्टवर प्रक्रिया न करता ते पाणी नदी, खाडी आणि समुद्रामध्ये सोडले जाते. याबाबत गाव पातळीवरुन ग्रामस्थ तसेच विविध सामाजिक कार्यकर्ते विरोधी भूमिका मांडतात. मात्र पुन्हा तोच प्रकार सुरु राहतो. या प्रकारामुळे नद्या, समुद्रातील पाण्याचे प्रदूषण होत असल्याने त्यातील जैव संपादेला धोका निर्माण होत आहे.
>जिल्ह्यात सहा
हजार टन कचरा
रायगड जिल्ह्यामध्ये सुमारे सहा हजार टन कचरा निर्माण होत आहे. त्याची विल्हेवाट लावण्यासाठी कोणतीच यंत्रणा नाही, तसेच डम्पिंग ग्राउंडही नाही. त्यामुळे कचºयाची समस्या निर्माण होत आहे. एखाद्या नवीन प्रकल्पासाठी लागणाºया जमिनीच्या संपादनासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला जातो. तसा प्रयत्न सरकार आणि प्रशासकीय पातळीवर डम्पिंग ग्राउंडसाठी लागणाºया जमिनीच्या संपादनासाठी होताना दिसत नाही.