रायगड जिल्ह्याचा दहावीचा निकाल 96.07 टक्के; यंदाही मुलीच ठरल्या हुश्शार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2020 04:19 PM2020-07-29T16:19:12+5:302020-07-29T16:19:12+5:30
रायगड: जिल्ह्याचा दहावीचा निकाल 96.07 टक्के लागला आहे. यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. 97.33 टक्के मुली तर 94.21 टक्के मुले ...
रायगड: जिल्ह्याचा दहावीचा निकाल 96.07 टक्के लागला आहे. यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. 97.33 टक्के मुली तर 94.21 टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दहावीचा निकाल तब्बल 19.29 टक्क्यांनी वाढला आहे. महाड आणि पनवेल तालुक्यातील प्रत्येकी 97.28 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने ते तालुके पहिल्या क्रमांकावर राहिले आहेत. सर्वाधिक (93.04 टक्के) कमी निकाल हा खालापूर तालुक्याचा लागला आहे. ऑनलाईन निकाल कळताच विद्यार्थ्यांनी एकच जल्लाेष केला.
राज्य शिक्षण मंडळाने मार्च महिन्यात घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी (29 जुलै) आनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी निकालातील बाजी मारली आहे. राज्यात सर्वाधिक 98.77 टक्के निकाल कोकण विभागाचा लागला आहे तर, सर्वात कमी 92.00 टक्के निकाल औरंगाबाद विभागाचा लागला आहे. यंदा दहावीचा निकाल हा थेट 19.29 टक्क्यांनी वाढला आहे. हा निकाल वाढण्यामागच नेमक कारण समोर आलं आहे.
कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी काही परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. तर काही ठिकाणी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द करण्यात आला हाेता. विद्यार्थ्यांना त्या विषयाचे सरासरी गुण देण्यात आले आहेत. तसेच अंतर्गत मूल्यमापन, कृतीपत्रिका आणि भूगोलाचे सरासरी गुणांमुळे यावर्षी निकालाचे प्रमाण वाढले आहे, अशी माहिती रायगड जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश खाेपकर यांनी लाेकमतशी बाेलताना दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊन आणि संचार बंदीमुळे दहावीच्या उत्तरपत्रिका तपासणीच्या तसेच विभागीय मंडळाकडे जमा करण्याच्या प्रक्रियेत अनेक अडचणी आल्या हाेत्या. मात्र कोरोनाच्या कालावधीतही मंडळाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आणि शिक्षकांनी निकाल तयार करण्याचे काम सुरूच ठेवले हाेते. याच कारणांनी 29 जुलै रोजी दहावीचा निकाल जाहीर करणे शक्य झाले आहे.
मागील वर्षी मार्च 2019 मध्ये 80ः20 पॅटर्न रद्द करून सर्व विषयांची 100 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात आली. त्यामुळे निकालाची टक्केवारी चांगलीच घसरली होती. परंतु राज्य सरकारच्या आदेशानुसार राज्य मंडळाने मार्च 2020 मध्ये पुन्हा 80 गुणांची लेखी आणि 20 गुणांची तोंडी परीक्षा घेतल्यामुळे यंदा निकालात 19.29 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यंदाही मुलींनीच निकालात बाजी मारली आहे. मुलींचा निकाल 97.33 टक्के तर मुलांचा निकाल 94.21 टक्के लागला आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 98.77 टक्के लागला आहे, तर कोकणनंतर कोल्हापूर विभाग 97.64 टक्यांनी दुसऱ्या क्रमांकावर तर पुणे विभाग 97.34 टक्क्यांनी तिसऱ्या क्रमांकावर राहिला आहे.
------
जिल्ह्यात 551 शाळेतील 35 हजार 326 विद्यार्थ्यांनी नाेंदणी केली हाेती. पैकी 35 हजार 160 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली हाेती. त्यातील 33 हजार 778 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाची टक्केवारी 96.07 टक्के आहे.
-------
तालुका निहाय निकालाची टक्के वारी
-----------------------------------------------------------------------------
तालुका परीक्षेला बसलेले विद्यार्थी पास झालेले विद्यार्थी टक्केवारी
-----------------------------------------------------------------------------
पनवेल 10,945 10,647 97.28
महाड 2,573 2,503 97.28
माणगाव 2,178 2,117 97.02
राेहा 2,045 1,972 96.43
मुरुड 713 687 96.35
अलिबाग 2,808 2,697 96.05
पाेलादपूर 575 551 95.83
तळा 403 386 95.78
पेण 2561 2,447 95.55
म्हसळा 861 820 95.24
कर्जत 2904 2757 94.94
श्रीवर्धन 966 917 94.93
उरण 2,243 2,118 94,43
सुधागड 815 768 94.23
खालापूर 2,570 2,391 93.04
-------------------------------------------------------------------------------
35,160 33,778 96.07