शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी केला पलटवार, काय दिलं उत्तर?
2
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
3
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
4
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
5
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
6
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
7
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
8
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
9
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
10
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
11
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
12
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
13
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
14
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
15
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
16
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
17
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
18
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
19
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
20
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात

महाराजांच्या जयघोषाने रायगड दुमदुमला; शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यास प्रारंभ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2019 2:51 AM

देश-विदेशातील मान्यवरांची उपस्थिती

डॉ. प्रकाश मुंज

रायगड : अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्यावतीने येथे गुरुवारी ३४५वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी सायंकाळी गडपूजन आणि जागर शिवकालीन युद्धकलेचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमला.

कोल्हापूर हायर्कसच्या वतीने गडपूजन सोहळ्यासाठी राज्यातील अनेक गडकिल्ल्यांवरून तसेच लेह लडाख येथील स्टोट कांग्रीचे जल आणण्यात आले होते. खासदार संभाजीराजे यांच्या हस्ते गडपूजन झाले. त्यानंतर शिवकालीन युद्धकलेच्या प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम झाला. राज्यातील युद्धकला आखाड्यांचा यात सहभाग होता. तलवार, भाला, जांबिया, माडू, फरी- गदगा यांचे सादरीकरण झाले. या वेळी इतिहास अभ्यासक राम यादव यांच्या दुर्गराज रायगड परिचित-अपरिचित स्थळांचे छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.बुधवारी दिवसभर शिवभक्तांनी रायगडावर स्वच्छता मोहीम राबविली. बा रायगड परिवाराच्या वतीने ३१० शिवसैनिक, तर नामाचे मानकरी (लाटवडे, ता. हातकणंगले) या मोहिमेत सहभागी झाले. सोलापूरच्या विजय क्षीरसागर या चिमुकल्याने पोवाड्याचे गायन केले.अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती यांच्यावतीने शिवराज्याभिषेक सोहळा, दुर्गराज रायगड येथे गुरुवारपासून सुरू झाला. यावेळी ‘जागर शिवकालीन युध्दकलेचा’ या मर्दानी खेळाचे सादरीकरण झाले. राज्यभरातून आलेल्या शिवभक्तांनी होळीच्या माळावर आपली युध्दकला या माध्यमातून सादर केली. या वेळी संभाजीराजेंसमवेत पोलंड व चीन येथील प्रतिनीधी उपस्थित होते.

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजRaigadरायगड