Raigad: तीन आमदारांच्या पेचामुळे आजपर्यंत मंत्रिपदापासून दूर, आमदार भरत गोगावले यांची खंत

By राजेश भोस्तेकर | Published: August 16, 2023 10:05 PM2023-08-16T22:05:14+5:302023-08-16T22:42:57+5:30

Bharat Gogawle: छत्रपती शिवाजी महाराज यांनी मावळ्यांच्या साथीने स्वराज्याची स्थापना केली. त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे हे आमच्या जीवावर मुख्यमंत्री झाले आहेत. असे मत शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी केले आहे.

Raigad: Embarrassment of three MLAs has kept MLA Bharat Gogawle away from the ministry till date | Raigad: तीन आमदारांच्या पेचामुळे आजपर्यंत मंत्रिपदापासून दूर, आमदार भरत गोगावले यांची खंत

Raigad: तीन आमदारांच्या पेचामुळे आजपर्यंत मंत्रिपदापासून दूर, आमदार भरत गोगावले यांची खंत

googlenewsNext

- राजेश भोस्तेकर 
अलिबाग - छत्रपती शिवाजी महाराज यांनी मावळ्यांच्या साथीने स्वराज्याची स्थापना केली. त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे हे आमच्या जीवावर मुख्यमंत्री झाले आहेत. असे मत शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी केले आहे. एकाने पत्नी आत्महत्या करेल, दुसऱ्याने राजीनामा देतो तर तिसऱ्याने नारायण राणे संपवतील असे आमदार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गळ घातली. एकनाथ शिंदे हे पेचात पडल्याने त्यांना मंत्रिपद द्या असे सांगून आज पर्यंत मंत्रिपदापासून दूर राहिल्याची खंत आमदार भरत गोगावले यांनी बोलून दाखवली. शिवसैनिक, पदाधिकारी यांनी रात्री फोन बंद करून ठेवू नका असा सल्लाही गोगावले यांनी दिला आहे.

अलिबाग तालुक्यातील खानाव येथील काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत गोंधळी यांनी बुधवारी १६ ऑगस्ट रोजी आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. यावेळी अनेक सरपंच, इतर राजकीय पक्षातील पदाधिकारी यांनी शिंदे गटात प्रवेश केला. भरत गोगावले यांनी यावेळी सभेला संबोधिताना आपली खंत व्यक्त केली. तसेच राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती उपस्थितांना दिली. जनतेची सेवा करा, रात्री अपरात्री कोणाचा फोन आल्यास टाळू नका असा मोलाचा सल्लाही आमदार भरत गोगावले यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.'

अनंत गोंधळी आपण अमावस्या दिवशी पक्षात प्रवेश केला असून कोणावर अमावस्या उलटणार असा मिश्किल टोलाही विरोधकांना गोगावले यांनी मारला. मंत्री पदापासून दूर का राहिलो याबाबत ही गोगावले यांनी स्पष्टीकरण दिले. पहिल्या यादीत माझे नाव होते. मात्र तीन आमदार यांनी आपली समस्या मुख्यमंत्री याना सांगितली. एकाने मंत्रिपद न मिळाल्यास पत्नी आत्महत्या करेल, तर दुसऱ्याने मी राजीनामा देतो असे सांगितले. तर तिसऱ्याने मला मंत्रिपद मिळाले नाही तर नारायण राणे संपवतील असे सांगितले. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समोर पेच निर्माण झाल्याने अखेर मी त्यांना मंत्री करा असे सांगून बाजूला झालो. मात्र त्याबाबत मला बोलणी खावी लागत असल्याची खंत भरत गोगावले यांनी भाषणातून बोलून दाखवली. 

रायगड जिल्ह्यातून अनेक दिग्गज पुढील काळात शिवसेनेत येत आहेत. अलिबाग तालुक्यातील ६२ ग्रामपंचायतींना विकास कामासाठी दीडशे कोटी दिले. आधीच्या आमदारांनी विकास कामे केली नाहीत. त्यामुळे आज शेकाप हा संपत चाललेला पक्ष आहे. आम्ही जनतेची सेवा करीत असल्याने लोक आमच्या सोबत आहेत. अनंत गोंधळी यांच्या पक्ष प्रवेशाने यापरिसरतील असलेला शेकाप ही संपत आला आहे. उसर येथील गेल, एच पी कंपनीत स्थानिकांना रोजगार मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही यावेळी आमदार महेंद्र दळवी यांनी भाषणातून दिली. उमटे धरणासाठी १४१ कोटी निधी मंजूर केला असून सांबर कुंड धरणासाठी २ हजार कोटी निधी मंजूर झाल्याचेही आमदार दळवी यांनी म्हटले आहे.

Web Title: Raigad: Embarrassment of three MLAs has kept MLA Bharat Gogawle away from the ministry till date

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.