Raigad: अखेर घारापुरी बेटावरील वीजपुरवठा सुरू, महिनाभर पावसात केले अथक प्रयत्न

By नारायण जाधव | Published: July 27, 2023 04:03 PM2023-07-27T16:03:32+5:302023-07-27T16:06:12+5:30

Raigad: १५ जून २०२३ रोजी घारापुरी बेटावर वीजपुरवठा करणाऱ्या तीन केबल पैकी एक सिंगल कोर समुद्राखालील केबल नाव्हा खाडी ते मोराबंदर दरम्यान समुद्रामध्ये नादुरुस्त झाल्याने बेटावरील राजबंदर, शेतबंदर, मोराबंदर या तिन्ही गावचा वीजपुरवठा खंडित झाला होता.

Raigad: Finally, electricity supply to Gharapuri island has started, after a month of rain, tireless efforts have been made | Raigad: अखेर घारापुरी बेटावरील वीजपुरवठा सुरू, महिनाभर पावसात केले अथक प्रयत्न

Raigad: अखेर घारापुरी बेटावरील वीजपुरवठा सुरू, महिनाभर पावसात केले अथक प्रयत्न

googlenewsNext

नवी मुंबई - १५ जून २०२३ रोजी घारापुरी बेटावर वीजपुरवठा करणाऱ्या तीन केबल पैकी एक सिंगल कोर समुद्राखालील केबल नाव्हा खाडी ते मोराबंदर दरम्यान समुद्रामध्ये नादुरुस्त झाल्याने बेटावरील राजबंदर, शेतबंदर, मोराबंदर या तिन्ही गावचा वीजपुरवठा खंडित झाला होता. हा वीजपुरवठा  २ फेज द्वारे चालू केला होता. परंतु, थ्री फेज वीजपुरवठा नसल्याने पाणीपुरवठा करणारी मोटर बंद असून समुद्राच्या आत असलेल्या केबल मधील दोष शोधण्याचे काम महिना भरापासून सुरु होते. अधिकारी व कार्माच्यार्यांचा अथक प्रयत्नानंतर सर्व परिस्थितीवर मात करून वीजपुरवठा सुरळीत केला आहे. 
महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी घारापुरीचा वीजपुरवठा लवकरात लवकर सुरळीत करण्याचे निर्देश दिले होते. या कामाबाबत संचालक    (संचलन) संजय ताकसांडे यांच्याकडून सातत्याने आढावा घेण्यात येत आहे.

घारापुरी येथील दोन नादुरुस्त सिंगल कोर समुद्राखालील केबल मधील दोष न्हावाखाडी ते मोरा बंदर दरम्यान समुद्राचा आत असल्याने तसेच वादळ वाऱ्यासहित प्रचंड मुसळधार पाऊस, समुद्रातील भरती ओहोटी व त्यामुळे  उदभवणारी अपरिहार्य परीस्थितीवर मात करत सदरचे काम प्रगती पथावर चालू असून नादुरुस्त सिंगल कोर केबलमधला दोष शोधण्यासाठी महावितरणच्या पनवेल शहर विभागातील कर्मचारी मागील एक महिन्यापासून युध्दपातळीवर प्रयत्न करत होते.  सह व्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे व  भांडूप परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनिल काकडे यांनी जातीने लक्ष देऊन कामाला गती देण्यासाठी वाशी विभागाचे अधीक्षक अभियंता (प्रभारी), सिंहाजीराव गायकवाड यांना विशेष सूचना दिल्या. मागील महिना भरापासून संततधार पावसात अविरत काम करून वीजपुरवठा सुरळीत करण्यात आले आहे. त्यामुळे, बेटावरील तिन्ही गावांचा पाणी पुरवठाची  समस्या सोडवण्यात आली आहे.

आपल्या जीवाची पर्वा न  करता  प्रतिकूल परिस्थितीवर मात करून महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी समुद्र खालचे दोष शोधून काम पूर्ण करून वीजपुरवठा सुरळीत केल्याबद्दल  बेटावरील तिन्ही गावचे ग्रामस्थांनी  महावितरणचे आभार मानले आहे. या कामासाठी, पनवेल शहरचे कार्यकारी अभियंता सतीश सरोदे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता देविदास बैकर सहाय्यक अभियंता रणजीत देशमुख व विभागातील प्रत्येक कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेऊन या कठीण कामाला यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे.

Web Title: Raigad: Finally, electricity supply to Gharapuri island has started, after a month of rain, tireless efforts have been made

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.