- मधुकर ठाकूरउरण - खोल समुद्रात दुष्काळ जाणवत असल्याने आवक घटल्याने मागील काही दिवसांपासून मासळीचे भाव गगनाला भिडले आहेत.त्यामुळे खवय्यांनी आता मोर्चा स्थानिक बाजारात येणाऱ्या दुय्यम प्रतीच्या मासळी खरेदीकडे वळवला आहे.खवय्यांच्या पसंतीमुळे दुय्यम प्रतीच्या मासळीचेही भाव चांगलेच वधारले आहेत.
मुंबई, मुंबई उपनगर,ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या सात जिल्ह्यात मासेमारी व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो.हवामान आणि निसर्गाच्या लहरीवरच चालणार्या या व्यवसायावर सुमारे १५ लाखाहुन अधिक कुटुंब उदरनिर्वाह चालवितात. विविध प्रकारातील मासेमारी व्यवसायातुन मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते. निर्यातीच्या व्यवसायातुन देशाला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळते.मात्र देशाला प्रचंड परकीय चलन मिळवुन देणार्या मासेमारी व्यावसायिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.त्यामुळे निसर्गाच्या लहरीवर आधारित असलेला मासेमारी व्यवसाय याआधीच संकटात सापडला असतानाच आता मागील काही दिवसांपासून मच्छीमारांवर खोल समुद्रात मासळीच्या दुष्काळाचे सावट आले आहे.
त्यामुळे खोल समुद्रातील मासेमारीसाठी एका ट्रिपवर होणारा सुमारे साडेतीन लाखांचा केलेला खर्चही वसुल होत नाही.मासळीच्या दुष्काळामुळे खर्चाची रक्कमही वसूल होत नसल्याने मच्छीमारांनी मच्छीमार नौका बंदरात नांगरुन ठेवणेच पसंत केले आहे.यामुळे मात्र बाजारात येणाऱ्या मासळीची आवक घटली आहे.आवक घटल्याने मागील काही दिवसांपासून मासळीचे भाव गगनाला भिडले असल्याची माहिती करंजा मच्छीमार सहकारी संस्थेचे माजी अध्यक्ष तथा पंचायत समितीचे माजी सभापती नितीन कोळी यांनी दिली.
खवय्यांचा ओढा दुय्यम प्रतीच्या मासळी खरेदीकडेआवक घटल्याने खवय्यांनी आता मोर्चा स्थानिक मच्छीमारांकडून बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या मांदेली, बोंबील,निवठ्या,भिलजी,कोळीम, खुबे, कालवे, चिंबोरी, मुठे, किळशी,ढोमी,चिवणी, तळ्यातील गोडी मासळी आदी दुय्यम प्रतीच्या मासळीकडे वळवला आहे.यामुळे दुय्यम प्रतीच्या मासळीचेही भाव चांगलेच वधारले असल्याचे विक्रेत्या जयश्री कोळी यांनी सांगितले.
सुरमई, हलव्याने भाव दुप्पटीने वाढलेसध्या घोळ ऐवजी सुरमई आणि हलव्याच्या भावात दुप्पटीने वाढ झाली असल्याचे महिला विक्रेत्या शीतल कोळी यांनी सांगितले.
याआधीचे दर आजचे दरघोळ - ८०० ते ९०० की, ९०० ते ११०० किपापलेट ७०० ते ९०० कि. १००० ते १२०० किसुरमई ४५० ते ५०० कि. ८०० ते १००० किकोळंबी २५० ते ३५० कि ४०० ते ५५०रिबनफिश १०० ते १२५ नगास १५० ते २००हलवा ४५० ते ५०० कि, ८०० ते १००० कि.माकुळ २५० ते ४५० नग ६०० ते ८००रावस ५०० ते ७०० कि. ८०० ते १०००जिताडा. ८०० ते १००० कि. १००० ते १२०० किबांगडा ५ नगास ७५ ते १०० आज १०० ते १५० की.