रायगडला मिळाले ७० कोटी, निधीचे वाटप करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 12:08 AM2020-06-13T00:08:59+5:302020-06-13T00:09:13+5:30
वादळामुळे मोठी हानी : भरपाईपोटी प्राप्त निधीचे वाटप करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
निखिल म्हात्रे
अलिबाग : निसर्ग चक्रीवादळाने रायगड जिल्ह्यातील शेतकरी, बागायतदार आणि नागरिकांचे अतोनात नुकसान झाले. या भरपाईपोटी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या १०० पैकी ७० कोटी प्राप्त झाले आहेत. तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांना या प्राप्त निधीचे वाटप करण्याचे निर्देश जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत. त्यामुळे आता मदतीचे वाटप करण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर आहे.
रायगड जिल्ह्यात आतापर्यंत अनेक मंत्री, नेत्यांचे दौरे नुकसानग्रस्त भागात झालेले आहेत; परंतु आश्वासनाव्यतिरिक्त कोणतीही मदत देण्यात आलेली नव्हती. नुकसानाचे पंचनामे करण्यासाठी शेती-बागायतीपेक्षा घरादारांकडे लक्ष देण्याची भूमिका प्रशासनाने कृषिमंत्र्यांसमोर मांडली होती. आता कपडे, भांडी, घरे, कृषी या बाबींसाठी तातडीने आर्थिक मदत देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी संबंधितांना दिले.
नुकसानीचे सुयोग्य निकष तयार करता करता सरकार-प्रशासनही चक्रावले आहे. विरोधी पक्षनेत्यांनी श्रीवर्धन दौºयात १० दिवस उलटूनही वादळग्रस्त रायगडकरांच्या हातात फुटकी कवडीही पडली नसल्याची टीका नुकतीच केली होती. या पार्श्वभूमीवर रायगडला प्राप्त झालेली ७० कोटींची मदत काटेकोर वाटप करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये वादळामुळे झालेले एकूण नुकसान
१जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यात वादळामुळे जवळपास दोन हजार २४०० कच्ची घरे, ७३० पक्की घरे नष्ट झाली आहेत. एक लाख ६३ हजार घरे, २२ हजार हेक्टर क्षेत्रावरील फळबागा, एक हजार ४०० शाळा, एक हजार अंगणवाड्या, ३७ प्राथमिक आरोग्य केंद्रे, १२ ग्रामीण रुग्णालये, १५ जिल्हा परिषदेचे पशुवैद्यकीय दवाखाने, तीन तालुका लघु पशुवैद्यकीय चिकित्सालये, जिल्हा पशू वैद्यकीय चिकित्सालयाचे नुकसान झाले आहे.
२तसेच ११५ लहान-मोठी गुरेढोरे, ७२ हजार ७६० कोंबड्या, म्हसळा येथील शेळी फार्ममधील १५० पैकी नऊ शेळ्या मृत पावल्या आहेत. सद्य:स्थितीत अजूनही पंचनामे करण्याचे काम सातत्याने सुरू आहे. पुढील तीन ते चार दिवसांत पंचनाम्यांचे काम पूर्ण होईल. त्या वेळी नुकसानीची सविस्तर माहिती अंतिम करता येईल. मात्र नुकसानग्रस्तांना तातडीची आर्थिक मदत देण्याचे काम तत्काळ सुरू करण्यात आले आहे.
असे होणार निधीचे वाटप
च्७ कोटी ५० लाख पूर्णत: पडलेली घरे, तसेच कपडे, भांडी, इतर वस्तूंसाठी स्वतंत्र ७ कोटी ५० लाख देण्यात आले आहेत.
च्सार्वजनिक क्षेत्रातील कचरा, ढिगारे उचलण्यासाठी दोन कोटी
च्बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी २२ कोटी
च्मृत जनावरांसाठी १२ कोटी
च्पूर्णत: नष्ट झालेल्या आणि अंशत: पडझड झालेल्या पक्क्या व कच्चा घरांसाठी ११ कोटी ६२ लाख
च्दुकानदार आणि टपरीधारकांसाठी एक कोटी रुपयांचे वाटप करायचे आहे.