शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

Raigad: रायगडमध्ये मुसळधार,नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये, प्रशासनाकडून आवाहन

By राजेश भोस्तेकर | Published: July 19, 2023 11:46 AM

Raigad Rain Update: पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याने आपत्कालीन यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

- राजेश भोस्तेकर

अलिबाग - रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असून, सावित्री, पाताळगंगा, अंबा नद्यांनी धोका पातळी ओलांडली आहे. तर कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. पावसामुळे आंबेनळी घाटातून दरड कोसळली असून, पोलादपूर महाबळेश्वर दरम्यान वाहतूक ठप्प झाली आहे. ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. जिल्ह्यातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याने आपत्कालीन यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी पावसाचा जोर कायम आहे. जिल्ह्यातील बहूतांश भागात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे सावित्री, पाताळगंगा, अंबा नद्यांना पूर आला आहे. या नद्यांनी धोका पातळी ओलांडली आहे. त्यामुळे या नदी किनाऱ्याजवळील महाड, रसायनी, आपटा, नागोठणे, रोहा, चिरनेर परिसरातील सखल भागात पाणी जमा झाले आहे.

पावसामुळे आंबेनळी घाटातून दरड कोसळली असून, पोलादपूर महाबळेश्वर दरम्यान वाहतूक ठप्प झाली आहे. नेरळ कळंब रस्त्यावरील पुलावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतुक बंद करण्यात आली आहे. दरम्यान प्रादेशिक हवामान विभागाने आज आणि उद्या जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस पावसाची शक्यता वर्तवली आहे, त्यामुळे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये, तसेच एखादी आपत्ती निर्माण झाल्यास जिल्हा नियंत्रण कक्षासोबत संपर्क साधावा. पंचायत समिती गटविकास अधिकारी, आरोग्य विभागातील अधिकारी यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नदी किनारी असणाऱ्या गावातील पूर परिस्थितीकडे लक्ष ठेऊन आहोत.- डॉ. किरण पाटीलमुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद

टॅग्स :RaigadरायगडRainपाऊस