श्रमजीवींचा सहभाग नोंदवण्यात रायगड दुसरा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2019 12:13 AM2019-03-06T00:13:41+5:302019-03-06T00:13:46+5:30
केंद्र सरकारने १५ फेब्रुवारीपासून असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी प्रधानमंत्री श्रमजीवी मानधन पेन्शन योजना सुरू केली आहे.
अलिबाग : केंद्र सरकारने १५ फेब्रुवारीपासून असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी प्रधानमंत्री श्रमजीवी मानधन पेन्शन योजना सुरू केली आहे. कोणतीही पेन्शन योजना लागू नसलेले कामगार या योजनेसाठी पात्र असून, त्यांची ग्रामपंचायतस्तरावर नावनोंदणी करण्यात येत आहे. या योजनेचा प्रारंभ देशपातळीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी रायगड जिल्ह्यातील १४ हजार २७७ कामगारांनी या योजनेत सहभाग घेतला असून, राज्यात रायगड जिल्हा या कामात दुसऱ्या क्र मांकावर आहे.
या योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्यातून १४ हजार २७७ कामगारांनी सहभाग घेतला आहे. राज्यात सर्वाधिक सहभाग नोंदणी सातारा जिल्ह्यात असून त्या खालोखाल रायगड जिल्ह्यात आहे. ही नोंदणी अजूनही सुरूच असून, रायगड जिल्हा आणखी उत्कृष्ट कामगिरी करून दाखवेल, असा विश्वास प्रकल्प संचालक प्रकाश देवऋषी यांनी प्रास्ताविकात व्यक्त केला.
सर्वाधिक सहभाग नोंदविणाºया उत्कृष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांना या वेळी जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांच्या हस्ते गौरविण्यात आले. अलिबाग येथील विस्तार अधिकारी शर्मिला पाटील यांचा या वेळी विशेष गौरव करण्यात आला, तसेच लाभार्थ्यांना कार्ड वाटप करण्यात आले.
कार्यक्र मानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या देशपातळीवरील मुख्य सोहळ्याचे थेट प्रक्षेपण उपस्थितांना दाखविण्यात आले. या वेळी कामगार व कामगार क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते उपस्थित होते.
या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रकाश देवऋषी, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजनेचे
गिरीश डेकाटे आदी मान्यवर उपस्थित होते.