शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : राजकीय घडामोडींना वेग !महायुतीतील बड्या नेत्यांची दिल्लीत बैठक होणार;शिंदे दिल्लीला जाणार
2
पाकिस्तानात जोरदार संघर्ष, ७ दिवसांत १०० मृत्यू; कुर्रम जिल्ह्यात हिंसाचार पेटला
3
महाराष्ट्रात धक्कातंत्र? मुख्यमंत्री भाजपचाच होणार, पण नक्की कोणाला संधी?; पक्षातील ५ नावं स्पर्धेत
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
5
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
6
Stock Market Updates: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये तेजी; ऑटो शेअर्सवर दबाव
7
महायुतीच्या नव्या सरकारमध्ये गृहमंत्री कोण असेल? अजित पवार, एकनाथ शिंदे की....  
8
जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी
9
देशातील नंबर १ रेस्तराँ कोणतं? Anand  Mahindra यांचीही आहे गुंतवणूक; या यादीत घातलाय धुमाकूळ
10
शेअर बाजारातून चांगला रिटर्न मिळवण्याच्या मोहात गमावले ११ कोटी; अधिकाऱ्यासोबत काय घडले?
11
VI नंबर १, सन्मान कॅपिटल २, इंडियन ऑईल ३... ही अशी कोणती लिस्ट, ज्यात कोणालाही नकोय नाव?
12
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
13
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
14
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
15
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
16
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
17
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
18
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
19
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
20
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा

Raigad: उरणमध्ये पुरातन आदिशक्तींच्या मंदिरात भक्तीचा जागर 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2023 5:11 PM

Raigad News: उरण परिसरात पुरातन काळातील करंजा येथील श्री द्रोणागिरी देवी,उरण शहरातील श्री शितळादेवी (गावदेवी), मोरा गावातील श्री एकविरा देवी आणि जसखार गावची श्री रत्नेश्वरी देवी आदी आदिशक्तीची मंदिरे आहेत.

- मधुकर ठाकूरउरण  - उरण परिसरात पुरातन काळातील करंजा येथील श्री द्रोणागिरी देवी,उरण शहरातील श्री शितळादेवी (गावदेवी), मोरा गावातील श्री एकविरा देवी आणि जसखार गावची श्री रत्नेश्वरी देवी आदी आदिशक्तीची मंदिरे आहेत. जागृत, भक्तांच्या हाकेला धावून येणारी, भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी आणि भक्तांना पावणारी अशी देवींची ख्याती आहे.

श्री एकविरा देवी म्हणजे अवघ्या आगरी-कोळ्याचीच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रातील भाविकांचे श्रध्दास्थान आहे.कार्ल्यातील एकवीरा देवीच्या मंदिराप्रमाणेच उरण शहर पासून ३ किमीच्या उरण -मोरा  रस्त्यावरील डोंगरातील एका पाषाणी गुहेत श्री  एकविरा देवीचे मंदिर आहे.एका मोठ्या काळ्या कोरीव काम केलेले मंदिर आहे.या कोरीव मंदिरातील पाषाणातच श्री एकविरा देवी विराजमान झाली आहे. पांडवकालीन हे देवीचे स्वयंभू मंदिर असल्याचे सांगितले जात आहे.मात्र एकवीरा देवीचे स्वयंभू मंदिर लाखो भक्तांचे श्रद्धास्थान बनले आहे.त्यामुळे वर्षभरात या ठिकाणी भाविकांची रेलचेल असतेच. त्याव्यतिरिक्त नवरात्रीत या मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते.

करंजा येथील आगरी-कोळी समाजाचे श्रद्धास्थान असलेले श्री द्रोणागिरी देवीचे दुसरे प्राचीन मंदिर  आहे.द्रोणागिरी डोंगराच्या पायथ्याशी निसर्गाच्या कुशीत हे मंदिर आहे.हे मंदिर साधारणपणे ३५० वर्षांपूर्वीचे आहे.अरिष्टात भक्ताला स्वप्नात येऊन दृष्टांत दिल्यानंतर सापडलेल्या देवीच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.तीच ही श्री द्रोणागिरी देवी होय. करंजावासियांचीच नव्हे तर पंचक्रोशीतील भाविकांची आराध्य दैवत ठरली आहे.त्यामुळे वर्षभर या ठिकाणी पर्यटक आणि भाविकही मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात.नवरात्रीत भाविकांची संख्या चौपटीने वाढते.

उरण शहरातील देऊळवाडी येथील उरणावती व शितला देवीचे आणखी एक पुरातन मंदिर आहे.सुमारे २५० वर्षांपूर्वीचे हे मंदिर आहे.उरणावती देवीच्या नावावरुनच शहराचे नावही उरण पडले असल्याचे सांगितले जात आहे. देवीच्या मंदिरासमोरच पाषाणी दिपमाळा आहे. दर वर्षी चैत्र महिन्यातील पौर्णिमेला  देवींचा उत्सव असतो.या उत्सवासाठी भाविक मोठ्या   संख्येने येतात आणि दर्शनाबरोबरच यात्रेचा ही आनंद लुटतात.

उरण तालुक्यातील जसखार गावात पुरातन श्री रत्नेश्वरी देवीचे मंदिर आहे.देवी जसखार ग्रामस्थांची आराध्य दैवत आहे.जागृत देवीच्या दर्शनासाठी वर्षभरात भाविक येत असतात.सुमारे २०० वर्षापुर्वी एका भक्ताला मिळालेल्या दृष्टांतुन देवीची मूर्ती तलावात सापडली.त्यानंतर कौलारू मंदिरात रत्नेश्वरी देवीची स्थापना करण्यात आली होती.९ वर्षांपूर्वी या जुन्या देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असून त्या जागी पावणे चार कोटी खर्चून भव्यदिव्य मंदिर उभारण्यात आले आहे.तसेच डोंगरी येथील अंबादेवी आणि फुंडेवासियांची घुरबादेवी आदी देवीच्या मंदिरातही मोठ्या प्रमाणावर देवीचा जागर केला जातो.

भक्तांच्या हाकेला धावून येणारी,भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी आणि भक्तांना  पावणारी अशी देवींची ख्याती असलेल्या या चारही मंदिरात दर्शनासाठी दरवर्षी हजारो भाविकांची नवरात्रीपासुनच गर्दी उसळली आहे.

टॅग्स :RaigadरायगडNavratriनवरात्री