अलिबाग : रायगड जिल्ह्याला गेल्या २४ तासांत पावसाने चांगलेच झोडपून काढल्याने जनजीवन विस्कळीत झाले. वादळी वा-यासह पडलेल्या पावसाने अलिबाग शहरात काही ठिकाणी मोठी झाडे विजेच्या तारांवर पडण्याच्या घटना घडल्या. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.अलिबाग शहराला मोठ्या प्रमाणात पावसाने झोडपून काढल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. वादळी वाºयामुळे अलिबाग शहरातील मयेकर चाळ परिसरात विजेच्या तारांवर नारळाचे झाड कोसळल्याने मोठा स्फोट झाल्याचा आवाज झाला, तसेच विजेचे लोळ सर्वत्र उडाले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. नारळाचे झाड अर्धवट कोसळल्याने तेथील रहिवाशांवर आपत्तीची टांगती तलवार कायम आहे. त्याचप्रमाणे त्याच पसिरातील अन्य दोन नारळाची झाडे पूर्णत: लोकवस्तीमध्ये झुकल्याने तेही पडण्याची भीती तेथील रहिवाशांनी व्यक्त केली आहे. प्रशासनाने तातडीने अर्धवट पडलेले नारळाचे झाड त्याचप्रमाणे अन्य पडण्याच्या स्थितीमधील असणारी नारळाची झाडे तातडीने पाडावीत, अशी मागणी सुनंदा देसाई, किशोर देशमुख, लकेश अधिकारी यांच्यासह अन्य रहिवाशांनी केली.नारळाचे झाड विजेच्या तारांवर पडले तेव्हा पाऊस जोराने बरसत होता. त्यामुळे रस्त्यावरून रहदारी नव्हती. त्यामुळे तेथील मोठ्या प्रमाणातील जीवितहानी टळली, असेही रहिवाशांनी सांगितले. याच परिसरामध्ये भले मोठे आंब्याचे झाडही कोलमडून पडले. त्यामध्येही कोणतीही जीवितहानी झाली नाही. विजेच्या तारांवर झाडे कोसळल्याने वीज काही तास गायब होती. एमएसीबीच्या कर्मचाºयांनी तातडीने वीज प्रवाह खंडित करून लोंबकळणाºया तारा बाजूला केल्या. त्यानंतर तात्पुरता वीज प्रवाह सुरू करून दिला.>्रअलिबागमध्ये सर्वाधिक११५ मिमी पावसाची नोंदबुधवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सर्वाधिक ११५ मिमी पावसाची नोंद अलिबाग येथे झाली आहे. उर्वरित तालुक्यात पावसाचा जोर कमी झाला आहे.जिल्ह्यात विविध ठिकाणी एकूण २८ घरे व गोठ्यांचे मोठे नुकसान झाले आहे तर ७ गाई व बैलांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी दिवसभरातील नुकसानीचा आकडा ५० हजार रुपयांच्या घरात पोहोचला आहे.झाडे पडलेल्या ठिकाणचा पंचनामा करण्यास तलाठी आणि मंडळ अधिकारी यांना सांगण्यात आले आहे, असे अलिबागचे तहसीलदार प्रकाश सकपाळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.>तरुणांच्या उत्साहावर पाणीरोहा : गणेशोत्सवात सक्रि य झालेल्या पावसाने गेले दोन-तीन दिवस सर्वत्र पूरजन्य परिस्थिती निर्माण केली होती. गणपती विसर्जनानंतर काही काळ अल्पशी विश्रांती घेतलेल्या पावसाने नवरात्रौत्सवाच्या दरम्यान पुनश्च मुहूर्त साधत जोरदार कोसळण्यास सुरुवात केल्याने तरुणांच्या उत्साहावर पाणी फेरले आहे.नवरात्रीचे नऊ दिवस म्हणजे उत्सवाच्या उत्साहाबरोबरच रात्रीच्या दांडीया नृत्याचे आकर्षण व हौसमौज करण्याचे दिवस, परंतु नवरात्रौत्सवात पुन्हा एकदा पावसाने दमदार सुरुवात केल्याने शहरी भागासह ग्रामीण भागातही समस्त नागरिक व तरुणांमध्ये पावसाच्या आगमनावर चिंता व्यक्त केली आहे.दिवसा संपन्न होणाºया धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्र मांच्या आयोजनासाठी पावसाचा मोठा व्यत्यय ठरणार आहेच, याचबरोबर ठिकठिकाणच्या स्थानिक स्वयंसेवी संस्था व मंडळामार्फत विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्र मांचे आयोजन केले असल्याने आयोजकांची पावसाने फारच मोठी पंचाईत करून ठेवली आहे. पावसाची परिस्थिती संपूर्ण उत्सव काळात अशीच राहते की काय, अशी शंका उपस्थित केली जात आहे.>अतिवृष्टीमुळे भात शेतीचे नुकसान : अतिवृष्टीचा फटका अलिबाग तालुक्यातील समुद्र आणि खाडीलगतच्या भातशेतीला बसला आहे. पाऊस आणि वारा याच्या प्रवाहामुळे जनजीवन विस्कळीत झाले. भात पिके नव्वद टक्के तयार झाली आहेत आणि अचानक अतिवृष्टी झाली त्यामुळे तयार झालेली भातपिके शेतामध्ये आडवी पडली आहेत. यामुळे शेतकºयांचे नुकसान झाले आहे. वातावरणात बदल झाला नाही अधिक नुकसानीची शक्यता आहे.>तळा येथे दोन घरे, गोठ्याचे नुकसानतळा : दोन दिवस पडणाºया सततच्या पावसामुळे तालुक्यात दोन घरांचे व एका गुरांच्या गोठ्याचे नुकसान झाले असून, विजेचाही लपंडाव सुरू आहे.तालुक्यातील पिटसई सजाअंतर्गत वानास्ते गावात देवजी नासकर यांच्या घराचे नुकसान झाले असून, तलाठी वैशाली सत्वे यांनी पंचनामा केला आहे. अंदाजे २५ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले आहे, तर दुसरे शेनाटे येथे पांडुरंग बटावळे यांचे घर कोसळले आहे. यांचेही ६ हजार ४०० चे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही मनुष्यहानी झालेली नाही. तसेच सोनसडे सजाअंतर्गत कळसांबडे येथे प्रियवंदन कदम यांचा गुरांचा गोठा कोसळला आहे. तलाठी दिनेश साळुंखे यांनी पंचनामा केला असून, सुमारे २९ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले आहे. दोन दिवसांत साधारणपणे १३१ मिमी पाऊस पडला आहे.क ोरखंडे येथे झाड पडल्यामुळे विजेच्या तारा तुटल्यामुळे काही काळ विद्युत पुरवठा खंडित झाला होता. पावसामुळे शेतीचे नुकसान होत आहे. नुकसानग्रस्त शेतकºयांना महसूल विभागाकडून नुकसानभरपाई मिळालेली नाही. नुकसानीची माहिती वरिष्ठांकडे कळविण्यात येईल, अशी माहिती नायब तहसीलदार शरद मोते यांनी दिली.
रायगडमध्ये जनजीवन विस्कळीत, वादळी पावसामुळे विजेच्या तारांवर पडली झाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 3:01 AM