रायगड : पैसे दामदुप्पट करण्याचे आमिष दाखवून जिल्ह्यातील साडेचार हजार गुंतवणुकदारांना घातला पावणेपाच कोटींचा गंडा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 10:43 PM2017-12-29T22:43:54+5:302017-12-29T22:50:17+5:30

रायगड : जिल्ह्यातील तब्बल 4 हजार 340 गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे दामदुप्पट करण्याचे आमिष दाखवून गंडा घालून तब्बल एकूण पावणोपाच कोटींची फसवणूक केल्या प्रकरणी, ठाणे जिल्ह्यातील विरार येथील रहिवासी भुपेंद्र चंद्रकांत मालवणकर यास रायगड पोलीसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेशण शाखेने मोठय़ा शिताफीने अटक केले आहे.

Raigad: With the lure of doubling of money, it is worth crores of rupees to invest in 4000 investors in the district! | रायगड : पैसे दामदुप्पट करण्याचे आमिष दाखवून जिल्ह्यातील साडेचार हजार गुंतवणुकदारांना घातला पावणेपाच कोटींचा गंडा!

रायगड : पैसे दामदुप्पट करण्याचे आमिष दाखवून जिल्ह्यातील साडेचार हजार गुंतवणुकदारांना घातला पावणेपाच कोटींचा गंडा!

Next
ठळक मुद्देभुपेंद्र मालवणकर गजाआडसात दिवसांची पोलीस कोठडी

जयंत धुळप
लोकमत न्यूज नेटवर्क
रायगड : जिल्ह्यातील तब्बल 4 हजार 340 गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे दामदुप्पट करण्याचे आमिष दाखवून गंडा घालून तब्बल एकूण पावणोपाच कोटींची फसवणूक केल्या प्रकरणी, ठाणे जिल्ह्यातील विरार येथील रहिवासी भुपेंद्र चंद्रकांत मालवणकर यास रायगड पोलीसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेशण शाखेने मोठय़ा शिताफीने अटक केले आहे. शुक्रवारी मालवणकर यास येथील न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यास सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती आर्थिक गुन्हे अन्वेशण शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक जगदाळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे. 

दामदुप्पट रक्कम मिळणार असल्याची जाहिरात
मालवणकर याने सन 2०12 मध्ये अलिबाग तालुक्यात ओमसाई प्रोडक्ट सेल नावाची संस्था उभारली. या संस्थेमध्ये गुंतवणूक केल्यास दामदुप्पट रक्कम मिळणार असल्याची जाहिरात केली. तसेच वेगवेगळ्या योजना राबवित अनेकांना त्याने योजनेच्या जाळ्यात ओढले होते. त्यासाठी ठिकठिकाणी त्याचे प्रतिनिधी कार्यरत होते. अल्प कालावधीत अधीक परतावा मिळणार असल्याने या आमिषाला बळी पडून अनेक नागरिकांनी पैशांची गुंतवणूक करण्यास सुरु वात केली. गेल्या चार-पाच वर्षात नागरिकांचा विश्वास संपादन करुन 4 हजार 34० नागरिकांकडून त्यांच्या पैशांची गुंतवणूक या योजनेत करुन घेतली.

गुंतवणुकदारांना रक्कम परत देण्यास टाळाटाळ
जानेवारी 2०17 मध्ये ज्या गुंतवणूकदारांची गुतवणूक मूदत पूर्ण झाली त्यांनी परतावा मागण्यास प्रारंभ केला असता, गुंतवणुकदारांना रक्कम परत देण्यास टाळाटाळ करण्यास प्रारंभ झाला. आणि मालवणकर याच्याकडून गुतवणूकदारांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. नोटबंदीचा फटका बसला असल्याचे सांगून तो वारंवार गुंतवणुकदारांना टाळण्याचा प्रयत्न करीत होता.

गुंतवणुकदारांची फसवणूक केल्याचे निष्पन्न
दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर एका महिलेने याप्रकरणी जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्र ार केली. या तक्र ारीचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक अशोक जगदाळे व पोलीस हवालदार वैभव सायगावकर या पथकाने तपास सुरू केला. चौकशीमध्ये भुपेंद्र मालवणकर याने गुंतवणुकदारांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी मंगळवारी सायंकाळी भूपेंद्र मालणवकर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करून बुधवारी दुपारी अलिबाग न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने  सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

Web Title: Raigad: With the lure of doubling of money, it is worth crores of rupees to invest in 4000 investors in the district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.