Raigad: अनेक गणेशभक्तांकडून पर्यावरणपूरक मूर्तींची मागणी, रायगड जिल्ह्यातील आश्वासक चित्र

By निखिल म्हात्रे | Published: August 27, 2023 03:30 PM2023-08-27T15:30:21+5:302023-08-27T15:31:10+5:30

Ganeshotsav 2023: गणेशोत्सव अवघ्या 22 दिवसांवर येऊन ठेपला असून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाकडे गणेशभक्तांचा कल वाढत असल्याचे दिसून येते. गणेश भक्तांमध्ये हळूहळू पर्यावरण विषयक जागृती होत असून, शाडूच्या मातीपासून तयार केलेल्या गणेश मूर्तींच्या मागणीत वाढ होत आहे.

Raigad: Many Ganesha devotees demand eco-friendly idols, a promising picture from Raigad district | Raigad: अनेक गणेशभक्तांकडून पर्यावरणपूरक मूर्तींची मागणी, रायगड जिल्ह्यातील आश्वासक चित्र

Raigad: अनेक गणेशभक्तांकडून पर्यावरणपूरक मूर्तींची मागणी, रायगड जिल्ह्यातील आश्वासक चित्र

googlenewsNext

- निखिल म्हात्रे
अलिबाग - गणेशोत्सव अवघ्या 22 दिवसांवर येऊन ठेपला असून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाकडे गणेशभक्तांचा कल वाढत असल्याचे दिसून येते. गणेश भक्तांमध्ये हळूहळू पर्यावरण विषयक जागृती होत असून, शाडूच्या मातीपासून तयार केलेल्या गणेश मूर्तींच्या मागणीत वाढ होत आहे. यावर्षी जिल्ह्यातील जवळपास 30 टक्के गणेश भक्तांनी पर्यावरणपूरक मूर्तींची मागणी कारखानदारांकडे केली असल्याचे आश्‍वासक चित्र दिसून येत आहे. मात्र वजनाने हलक्या तसेच शाडूच्या मातीपेक्षा पीओपी स्वस्त असल्याने कारखानदारांचा कल पीओपीपासून मूर्ती तयार करण्याकडे असल्याचे दिसून येते.
गणेशोत्सव जवळ येताच मूर्ती कारखान्यांमध्ये गणेश मूर्ती तयार करण्याची लगबग सुरु आहे. कच्च्या गणपतीमूर्ती तयार करण्यात आल्या असून, मूर्तींची रंगरंगोटी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. गणेशभक्तांची पाऊले मूर्ती कारखान्यांकडे वळू लागली असून, आपल्याला हव्या असलेल्या गणपती मूर्तीची आगावू नोंदणी भक्त करित असल्याचे चित्र दिसून येते.

मागील काही वर्षांपासून कारखान्यांमध्ये शाडूच्या मातीपेक्षा पीओपीपासून गणपती मूर्ती बनविण्यात येत आहेत. पीओपीच्या मूर्तींचे विसर्जनानंतर पाण्यात विघटन होत नसल्याने पाणी प्रदूषित होते. यामुळे गणेशभक्तांनी पर्यावरणपूरक शाडूच्या मातीच्या मूर्तींची प्रतिष्ठापणा करावी, अशी मागणी पर्यावरण प्रेमींमधून करण्यात येत होती. पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा व्हावा, यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळही कार्यरत आहे.

जिल्ह्यातील गणेश भक्तांमध्येही हळूहळून पर्यावरणविषयक जागृती होत असल्याचे आश्‍वासक चित्र दिसून येत आहे. काही गणेशभक्त कारखान्यांमध्ये आपल्याला शाडूच्या मातीपासूनच बनविलेली गणपती मूर्ती हवी अशी मागणी करु लागले आहेत. यामुळे कारकानदारांनाही शाडूच्या मातीच्या मूर्ती बनवाव्या लागत आहेत. यावर्षी जिल्ह्यात जवळपास 30 टक्के नागरिकांनी शाडूच्या मातीपासून तयार केलेल्या मूर्तींची मागणी केली आहे.

पीओपीने मूर्ती तयार करण्याकडे कारखानदारांचा कल 
वजनाने हळक्या व शाडूच्या मातीपेक्षा पीओपी स्वस्त असल्याने गणपती मूर्ती कारखानदारांचा शाडूच्या मातीपासून मूर्ती बनविण्यापेक्षा पीओपीपासून गणपती मूर्ती बनविण्याकडे कल आहे. तसेच शाडूच्या मातीपासून गणपतीची कच्ची मूर्ती बनविण्यासाठी तसेच मूर्तीचे कोरिवकाम करण्यासाठी एका कारागिराला दोन दिवस जातात. तर पीओपीपासून एका दिवसात एक कारागिर दोन मूर्ती तयार करतो. तसेच पीओपीची मूर्ती सुकविणे शाडूच्या मातीच्या मूर्तीपेक्षा सोपे जाते. पीओपीच्या मूर्तीची आखणी करणेही शाडूच्या मातीच्या मूर्तीपेक्षा सोपे आहे. या कारणांमुळेही कारखानदार पीओपीपासूनच मूर्ती करणे पसंत करतात. तसेच या सर्व कारणांमुळे पीओपीच्या मूर्तीपेक्षा शाडूच्या मातीपासून तयार केलेल्या मुर्ती या महाग असतात.

शाडूच्या मातीपेक्षा पीओपीच्या सहाय्याने गणपती मूर्ती तयार करणे सहज सोपे आहे. पीओपीची मूर्तीची आखणीही शाडूच्या मातीपेक्षा चांगली दिसते. तसेच पीओपीच्या मूर्ती वजनाने हलक्या असल्याने त्या एका जागेवरुन दुसऱ्या जागेवर हलविणे सोपे जाते. तसेच शाडूच्या मातीच्या मूर्ती महाग असल्याने गणेश भक्तही मोठ्या प्रमाणात पीओपीच्या मूर्ती खरेदी करतात. मात्र काही गणेशभक्त शाडूच्या मातीपासून तयार केलेल्या मूर्तींची मागणी करित असून, अशा भक्तांसाठी शाडूच्या मातीपासून गणपतीमूर्ती तयार करित आहोत.
- नितिन पेडणेकर, मुर्तीकार.

Web Title: Raigad: Many Ganesha devotees demand eco-friendly idols, a promising picture from Raigad district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.