रायगडच्या खासदाराचा आज फैसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 11:37 PM2019-05-22T23:37:27+5:302019-05-22T23:38:33+5:30

मतदारराजाचा फायनल कौल कळणार । सकाळी ८ पासून सुरू होणार मतमोजणी । कोणाच्या विजयाचा होणार जल्लोष

Raigad MP today's decision | रायगडच्या खासदाराचा आज फैसला

रायगडच्या खासदाराचा आज फैसला

googlenewsNext

अलिबाग : रायगड लोकसभा मतदारसंघात एकूण १६ उमेदवार रिंगणात होते. मात्र, खरी लढत झाली ती विद्यमान खासदार आणि केंद्रीय मंत्री शिवसेनेचे अनंत गीते आणि राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेकाप आणि मित्रपक्ष आघाडीचे सुनील दत्तात्रेय तटकरे या दोघांमध्येच. या दोघांव्यतिरिक्त नथुराम हाते (ब.मु.प.), सुमन कोळी (व.ब.आ), मिलिंद साळवी (बसप), मधुकर खामकर (अपक्ष), संदीप पार्टे (बमप), सुभाष पाटील (अपक्ष), संजय घाग (अपक्ष), गजेंद्र तुरबाडकर (क्र ाजस), प्रकाश कळके (भाकिप), अविनाश पाटील (अपक्ष), योगेश कदम (अपक्ष), मुजफ्फर चौधरी (अपक्ष), सुनील तटकरे (अपक्ष), सुनील तटकरे (अपक्ष) यांचा समावेश आहे.


राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार सुनील तटकरे यांच्याशी नामसाधर्म्य असणारे दोन अपक्ष सुनील तटकरे हे उमेदवार शिवसेनेने उभे करून मते बाद करण्याचा प्रयत्न केला आहे. गतवेळी देखील सुनील श्याम तटकरे हे नामसाधर्म्याचे उमेदवार रिंगणात होते व त्यांना १० हजार मते मिळाली होती. या वेळी दोघा अपक्ष तटकरेंना नेमकी मते किती मिळतात याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. आमची मते बाद होणार नाहीत, याकरिता संपूर्ण काळजी घेतल्याने धोका नाही, असा दावा राष्ट्रवादीचे तटकरे यांच्या समर्थकांचा आहे. सेना-भाजपचे मनोमिलन झाले होते. परिणामी, गीतेंचा विजय नक्की, असा दावा शिवसैनिकांचा आहे. निकालाअंतीच करण्यात येणाºया या दाव्यांवर शिक्कामोर्तब होणार आहे.


स्ट्राँगरूम सुरक्षा व्यवस्था चोख
मतमोजणी कक्षात सीसीटीव्ही निगराणीत टेबलवर ईव्हीएम तीन टप्प्यांत पाठविण्याचे नियोजन आहे. टप्पा -१- स्ट्राँगरूम ते प्रवेशद्वार, टप्पा-२- स्ट्राँगरूम बाह्य प्रवेशद्वार ते मतमोजणी केंद्र प्रवेशद्वार, टप्पा-३-मतमोजणी केंद्र प्रवेशद्वार ते मतदारसंघनिहाय १ ते १४ टेबलपर्यंत विनाव्यत्यय अखंडपणे वाहतुकीचे कडक बंदोबस्तासह नियोजन करण्यात आले. मतमोजणी केंद्र परिसरात ९० सीसीटीव्हीचे जाळे असून सुरक्षारक्षकांचे टेहळणी मनोरेदेखील तैनात आहेत. त्यावरून जवान २४ तास अतिशय बारकाईने नजर ठेवून आहेत.

मतमोजणी प्रक्रिया चालते तरी कशी?
अलिबाग : रायगड लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी अलिबाग जवळच्या नेहुली येथील रायगड जिल्हा क्र ीडा संकुलातील संपूर्ण वातानुकूलित सभागृहात होणार आहे. मतमोजणी केंद्राच्या १०० मीटर परिघात सीआयएसएफ जवान, एसआरपी व रायगड पोलीस अशी त्रिस्तरीय सुरक्षा तैनात आहे.
१५६ मतमोजणी फेºया : रायगड लोकसभा मतदारसंघातील अलिबाग, पेण, श्रीवर्धन, महाड, दापोली, गुहागर अशा एकूण सहा विधानसभा मतदारसंघामध्ये विधानसभा मतदारसंघनिहाय प्रत्येकी १४ टेबल्सचे नियोजन.

पोस्टल बॅलटची प्रथम मोजणी
सर्वप्रथम ईटीपीबीएस (इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलट सिस्टीम) मते बारकोडद्वारे, तर त्यानंतर पोस्टल बॅलेटद्वारे प्राप्त झालेली मते मोजली जातील. रायगड लोकसभा मतदारसंघात ईटीपीबीएसचे १४०५ व पोस्टल बॅलेटचे एकूण ९३९९ असे एकूण १० हजार ८०४ मतदार आहेत.


या उमेदवारांच्या निकालाकडे साऱ्यांचे लक्ष
अनंत गीते । शिवसेना : रत्नागिरीमध्ये चार वेळा तर रायगडमध्ये दोन वेळा असे कोकणातून सहा वेळा खासदार म्हणून निवडून आलेले केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अंनत गीते या वेळी तिसºयांदा निवडून येऊन रायगडमध्ये हॅट्ट्रिक साधणार असा दावा सेना-भाजप नेते व कार्यकर्त्यांचा आहे; परंतु हे वास्तवात उतरणार का नाही, हे मतमोजणीअंतीच आता निश्चित होणार आहे. सेनाध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवर गीतेंच्या प्रचाराकरिता मतदारसंघात आले होते.
सुनील तटकरे। राष्ट्रवादी : २०१४ मध्ये केवळ २०१० मतांनी निसटता पराभव स्वीकारावा लागलेल्या तटकरे यांनी या वेळी गीतेंना चांगलीच टक्कर दिली असून, या वेळी सुनील तटकरे हेच खासदार होणार अशी खात्री राष्ट्रवादी, काँग्रेस, शेकाप आणि मित्र पक्षांची आहे. शेकापची भक्कम साथ आणि काँग्रेसबरोबरचे मनोमिलन याच्या जीवावरच तटकरे विजयी होणार, असा पक्का दावा तटकरे समर्थकांचा आहे.

Web Title: Raigad MP today's decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :raigad-pcरायगड