Raigad: जिल्ह्यात माझी लाडकी बहीण योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी - जिल्हाधिकारी किशन जावळे

By निखिल म्हात्रे | Published: July 12, 2024 11:15 PM2024-07-12T23:15:04+5:302024-07-12T23:15:33+5:30

Raigad News: राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी, आर्थिक स्वातंत्र्य, त्यांचे आरोग्य, पोषणात सुधारणेसाठी आणि बळकटीकरणासाठी राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ ही महत्वाकांक्षी योजना सुरू केली आहे.

Raigad: My Beloved Sister Scheme should be effectively implemented in the district - Collector Kishan Jawle | Raigad: जिल्ह्यात माझी लाडकी बहीण योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी - जिल्हाधिकारी किशन जावळे

Raigad: जिल्ह्यात माझी लाडकी बहीण योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी - जिल्हाधिकारी किशन जावळे

- निखिल म्हात्रे
अलिबाग - राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी, आर्थिक स्वातंत्र्य, त्यांचे आरोग्य, पोषणात सुधारणेसाठी आणि बळकटीकरणासाठी राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ ही महत्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण ही योजना ऐतिहासिक योजना आहे. या योजनेची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’योजनेची आज आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड, अपर जिल्हाधिकारी सुनिल थोरवे, उपजिल्हाधिकारी सा.प्र.रविंद्र शेळके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालकल्याण निर्मला कुचिक,जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विनित म्हात्रे,जिल्हा प्रशासन अधिकारी श्याम कोशेट्टी,अलिबाग नगर परिषद मुख्याधिकारी अंगाई साळुंखे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी जावळे यांनी या योजनेचे जिल्ह्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने सर्व तहसिलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी यांनी सूक्ष्म नियोजन करावे अशा सूचना यावेळी दिल्या. तसेच ग्रामपंचायत तसेच शहरांमध्ये योजनेची व्यापक प्रसिद्धी करावी. संपूर्ण जिल्ह्यात पोस्टर्स, बॅनर, जिंगलद्वारे प्रचार व प्रसार करावा.प्रत्येक शनिवार चावडी वाचनचे आयोजन करावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. या योजनेच्या यशस्वीतेसाठी प्रशासनातील सर्व घटकांचे सहकार्य घ्यावे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
 

Web Title: Raigad: My Beloved Sister Scheme should be effectively implemented in the district - Collector Kishan Jawle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड