- वैभव गायकरपनवेल - नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पग्रस्तांनी दि.12 रोजी पनवेल मधील ओवळे खाडीत प्रकल्पग्रस्तानी जलसमाधी आंदोलन केले. वारंवार मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने सिडको आणि राज्य शासनाच्या जाचाला कंटाळून प्रकल्पग्रस्तांचे जलसमाधी आंदोलन पुकारले होते.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ काही महिन्यात पूर्णत्वास येणार आहे.पनवेल मधील चिंचपाडा, कोपर, कोल्ही, उलवे, वरच ओवळा, वाघिवली, वाघिवली वाडा, गणेशपुरी, तरघर व कोंबडभुजे वडघर, कोल्ही,तरघर कोंबडभुजे, उलवे, गणेशपुरी या गावांच स्थलांतर झाले आहे. व स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या शेतजमीन देखील संपादित केल्या आहेत. कोणत्याही प्रकारचे योग्य पुनर्वसन न करता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सिडकोच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्त नागरिकांची गावे जमिनी घेण्यात आले आहेत मात्र सिडकोच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्तांच्या मागणीचा कोणताही विचार केला नसल्याचा आरोप विक्रांत पाटील यांनी केला आहे.विमानतळासाठी भराव केला असून या भरावामुळे कित्येक गावे बाधित झाली आहेत गावात पाणी शिरणे गावात पूरस्थिती निर्माण होणे असे प्रकार होत आहेत.या भरावामुळे बाधित झालेल्या गावांचे पुनर्वसन तात्काळ करावे आणि संपादित जमिनीची नुकसान भरपाई मिळावी अशी प्रकल्पग्रस्तांची मागणी असून. या मागण्यांसाठी प्रकल्पग्रस्तांनी जलसमाधी आंदोलन केले.