रायगड जिल्ह्यातील प्रश्नाबाबत झाली गंभीर चर्चा, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाल्या  बैठका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 09:05 PM2018-10-31T21:05:24+5:302018-10-31T21:05:43+5:30

अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री आणि रायगड जिल्ह्याचे पालक मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात विविध बैठका पार पडल्या.

Raigad News | रायगड जिल्ह्यातील प्रश्नाबाबत झाली गंभीर चर्चा, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाल्या  बैठका

रायगड जिल्ह्यातील प्रश्नाबाबत झाली गंभीर चर्चा, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाल्या  बैठका

Next

- जयंत धुळप  
अलिबाग  - अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री आणि रायगड जिल्ह्याचे पालक मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात विविध बैठका पार पडल्या. यात रायगड जिल्ह्यातील प्रलंबित समस्यांचा आढावा त्यांनी घेतला. विविध विषयांवर झालेल्या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, स्थानिक लोकप्रतिनिधी व संबधित विभागांचे अधिकारी उपस्थ‍ित होते.

रायगड येथे रिलायन्स गॅस पाईपलाईनसाठी संपादित केलेल्या जमिनीच्या मोबदल्यात तफावत असल्याप्रकरणी पेण प्रांत कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केले आहे, तसेच रिलायन्स गॅस पाईपलाईनसाठी तालुक्यातील काही  शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. यावेळी शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मोबदल्यात असलेली तफावत दूर करण्यात यावी तसेच शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला मिळावा यासाठी त्यांनी पाठवलेले प्रस्ताव मंजूर करण्यात यावा, असे निर्देश राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले. 

रायगड येथील पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांच्या पैशातून घेतलेल्या जमिनीच्या प्रश्नांबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाणबुडी प्रकल्प, भारत सरकारच्या चॅम्पियन सर्व्हिस सेक्टरमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी घेण्यात येणारे नाविन्यपूर्ण प्रकल्प, स्वदेश दर्शन या विषयांवर सिंधुदुर्ग जिल्हा जल पर्यटन विकास कामांबाबत आढावा बैठक घेण्यात आली.
 

Web Title: Raigad News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड