Raigad: वाहतूक कोंडीच्या बैठकीत नागरिकांच्या तक्रारींचा पाऊस, शासकीय विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची पाठ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2022 07:08 PM2022-08-25T19:08:49+5:302022-08-25T19:09:30+5:30

Raigad News: उरण परिसरातील विविध रस्त्यांवर सातत्याने होणारी वाहतूक कोंडी , कंटेनर -ट्रेलरची अवैध पार्किंग, बेशिस्त वाहतूक आणि त्यामुळे होणारे शेकडो रस्ते अपघात आदी वाहतूक कोंडीच्या विविध समस्यांवर गुरुवारी आयोजित  करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत नागरिकांनी अक्षरशा समस्यांचा पाऊसच पाडला.

Raigad News: Rain of citizens' complaints in the traffic jam meeting, the back of senior officials of government departments | Raigad: वाहतूक कोंडीच्या बैठकीत नागरिकांच्या तक्रारींचा पाऊस, शासकीय विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची पाठ

Raigad: वाहतूक कोंडीच्या बैठकीत नागरिकांच्या तक्रारींचा पाऊस, शासकीय विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची पाठ

Next

- मधुकर ठाकूर 
उरण : उरण परिसरातील विविध रस्त्यांवर सातत्याने होणारी वाहतूक कोंडी , कंटेनर -ट्रेलरची अवैध पार्किंग, बेशिस्त वाहतूक आणि त्यामुळे होणारे शेकडो रस्ते अपघात आदी वाहतूक कोंडीच्या विविध समस्यांवर गुरुवारी (२५) जेएनपीए कामगार वसाहतीच्या सभागृहात आयोजित  करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत नागरिकांनी अक्षरशा समस्यांचा पाऊसच पाडला.

उरण सामाजिक संस्थेने उरण परिसरातील सातत्याने होणारी वाहतूक कोंडी आणि त्यामुळे होणाऱ्या शेकडो अपघातांना जबाबदार धरून नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी २०१७ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात महसूल विभाग, सिडको, जेएनपीटी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरटीओ  जनहित याचिका दाखल केली आहे.या याचिकेची गंभीरपणे दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने २०१८ मध्ये विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची समिती तयार करण्याचे आदेश दिले आहेत.तसेच गठीत करण्यात आलेल्या समितीच्या नियमित बैठका घेऊन वाहतूक कोंडी व अपघाताबाबत सातत्याने पाठपुरावा करून उच्च न्यायालयाला अहवाल सादर करण्याच्या निर्देशही देण्यात आले आहेत.उच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन होत नसल्याने सातत्याने होणाऱ्या  परिसरातील वाहतूक कोंडीची व अपघाताची समस्या दूर करण्यासाठी गुरुवारी ( २५ ) उरण सामाजिक संस्थेने महसूल विभाग, सिडको, जेएनपीटी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरटीओ आदी अधिकारी,आजी-माजी लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  जेएनपीटी कामगार वसाहतीमधील बहुउद्देशीय सभागृहात आयोजित करण्यात या बैठकीला उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे, संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील व सचिव संतोष पवार,जेएनपीएचे माजी कामगार ट्र्स्टी भूषण पाटील,दिनेश पाटील, राकॉचे प्रशांत पाटील, भावना घाणेकर,सिडकोचे अभियंता एम. एम. मुंडे, जेएनपीएचे कुलकर्णी,न्हावा-शेवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर भटे, सेनेचे नरेश रहाळकर आदींसह उरणमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

या आयोजित बैठकीत सर्व्हिस रोडसह गव्हाण फाटा - चिरनेर, जेएनपीए-पळस्पे,द्रोणागिरी नोड परिसरातील विविध रस्ते, उड्डाणपूल आदी दुतर्फा   मार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे.या वाहतूक कोंडीमुळे अपघातांची संख्या कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यातच ठिक ठिकाणी कंटेनर -ट्रेलरची होणारी अवैध पार्किंग, बेशिस्त वाहतूक आणि त्यामुळे होणारे शेकडो रस्ते अपघात आदी वाहतूक कोंडीच्या विविध समस्यांवर बैठकीत नागरिकांनी अक्षरशा समस्यांचा पाऊसच पाडला.यावेळी उरण मधील कंटेनर गोदामाच्या वाहनतळाची माहिती घेऊन नियमानुसार गोदामात वाहनतळ न उभारणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, जेएनपीएला जोडणाऱ्या दोन्ही राष्ट्रीय महामार्गावरील बेकायदा कंटेनर वाहने हटविण्याची कारवाई करण्यात यावी ,सुरक्षा नियमांचे पालन न करणाऱ्या कंटेनर वाहनांवर कारवाई करावी, रस्त्यातील खड्डे भरण्याचीही मागणी यावेळी करण्यात आली.तसेच गव्हाण फाटा ते दिघोडे,खोपटे- कोप्रोली, मार्गावरील उरण शहरातील कोंडी आदी समस्या मांडण्यात आल्या. या गंभीर समस्यांकडे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडूनच होणाऱ्या अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा ठपका ठेवून नागरिकांनी त्यांच्या संतापाला वाट करून दिली.

उरण, न्हावा- शेवा, आणि उरण वाहतूक विभाग पोलिसांना   नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती वाहतूक पोलीस उपायुक्त संजय पवार यांनी बैठकीत दिली.
तर संबंधित विभागाचा आढावा घेऊन बैठक घेण्याचे आश्वासन दिले.

 मुंबई उच्च न्यायालयाने समिती गठीत करून वाहतूक कोंडी व अपघाताच्या माहितीचा अहवाल सादर करण्याच्या निर्देश दिले आहेत.मात्र संबंधित शासकीय विभागांचे अधिकारीच न्यायालयाच्या आदेशांचे पालन करताना दिसत नाहीत.आजच्या बैठकीसाठीही संबंधित विभागाच्या प्रत्येक विभागातील निर्णय घेण्याची क्षमता असलेले सक्षम अधिकाऱ्यांनी उपस्थित दाखविण्याची आवश्यकता होती.मात्र  संबंधित विभागाचा एकही वरिष्ठ अधिकारी उपस्थित नसल्याने कोणत्याही ठोस निर्णयाविना ही  बैठक वांझोटीच ठरली आहे.यामुळे न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन होत असल्याची संतप्त प्रतिक्रिया उरण सामाजिक संस्थेचे सरचिटणीस संतोष पवार यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Raigad News: Rain of citizens' complaints in the traffic jam meeting, the back of senior officials of government departments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड