Raigad: पालकांनी स्वत:सह आपल्या मुलांना मोबाईल व्यसनापासून लांब ठेवा, धनेश्वरी कडू यांचा सल्ला

By निखिल म्हात्रे | Published: December 21, 2022 01:54 PM2022-12-21T13:54:09+5:302022-12-21T13:55:31+5:30

Raigad: आताची युवा पीढी हि मोबाईलच्या व्यसनाधिन होत चाललेली आहे. जीथे पाहव तिथे हि मुल व्हॅट्सअप, फेसबुक, इंन्ट्राग्राम, पब्जी खेळाताना दिसून येत आहेत. त्यामुळे त्यांचा आपापसातील संवाद तुटत चालला आहे.

Raigad: Parents should keep their children away from mobile addiction, advises Dhaneshwari Kadu | Raigad: पालकांनी स्वत:सह आपल्या मुलांना मोबाईल व्यसनापासून लांब ठेवा, धनेश्वरी कडू यांचा सल्ला

Raigad: पालकांनी स्वत:सह आपल्या मुलांना मोबाईल व्यसनापासून लांब ठेवा, धनेश्वरी कडू यांचा सल्ला

Next

अलिबाग - आताची युवा पीढी हि मोबाईलच्या व्यसनाधिन होत चाललेली आहे. जीथे पाहव तिथे हि मुल व्हॅट्सअप, फेसबुक, इंन्ट्राग्राम, पब्जी खेळाताना दिसून येत आहेत. त्यामुळे त्यांचा आपापसातील संवाद तुटत चालला आहे. याची विविध उदाहरण देत शोशल नेटवर्क किती घातक आहे, हे विद्यार्थ्यांना धनेश्वरी कडू यांनी पटवून दिले. तसेच पालकांनी स्वत:सह आपल्यामुलांना मोबाईल व्यसनापासून लांब ठेवण अत्यावश्क आहे.

जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम, जिल्हा रुग्णालय रायगड अलिबाग यांच्या तर्फे बेलोशी येथील को.ए.सो. संचलित ऍड. दत्ता पाटील माध्यमिक विद्यालय येथे किशोरवयीन मुलांचे मानसिक आरोग्य या विषयी इ. 8 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांना आणि उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमात समाजसेवा अधीक्षक मनोविकृती धनेश्वरी कडू यांनी किशोरवीन मुलांमधील मोबाईल च्या अतीवापराचे दुष्परिणामावर माहीती दिली. 

त्या म्हणाल्या की, सध्याची युवा वर्गाचा आवाडता गेम म्हणजे प्लेयर्स अननोन बॅटल ग्राऊंड अर्थात पब्जी हा ऑनलाइन खेळ पालक आणि शिक्षकांसाठी चिंतेची बाब ठरला आहे. या खेळामुळे तरुणांमध्ये नैराश्य आणि मानसिक ताण वाढत असल्याचे त्यातून दिसून येत आहे. रोज रात्री 10 ते 2 या वेळेत अनेक यूटयूब वाहिन्यांवर हिंदी आणि मराठीत पब्जीच्या सामन्यांचे थेट प्रक्षेपण करण्यात येते. दररोज साधारण 40 ते 50 हजार तरुण थेट प्रक्षेपण पाहतात. वाहिन्यांवर समालोचन करणारे तरुण हे नवे पब्जी स्टार म्हणून उदयास येत आहेत. त्यांना संकेत स्थळांच्या माध्यमातून 20 रुपयांपासून ते 15 हजार रुपयांपर्यंतची रक्कम टीप देतात.

समाजमाध्यमे आणि तंत्रज्ञानाचा गरजेपेक्षा जास्त वापर हानीकारक ठरू शकतो. पब्जी खेळाचा अतिवापर केल्यास तरुणांच्या मानसिकेतवर परिणाम होऊन नैराश्य येऊ शकते. पालकांनी योग्य काळजी घेणे गरजेचे असल्याचे धनेष्वरी कडू यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता विशाल दामोदरेयांनी केले. श्रीमती प्रफुल्ला कांबळे क्लिनिकल सायकॉलॉजीस्ट यांनी शिक्षकांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे मुख्याध्यापक भोईर आणि कनिष्ठ लिपिक चेरकर यांनी केले.

Web Title: Raigad: Parents should keep their children away from mobile addiction, advises Dhaneshwari Kadu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.