- राजेश भोस्तेकरअलिबाग - मुंबई भाऊचा धक्का येथून रो रो मध्ये बसून तो प्रवासी मांडवाकडे येण्यास निघाला. मांडवा बंदर जवळ येताच प्रवासी हा बोट मधून उभा राहिला आणि अचानक समुद्रात उडी घेतली. अचानक झालेल्या या प्रकाराने बोटतील प्रवासी आणि कर्मचारी याच्यामध्ये खळबळ माजली. समुद्रात उडी मारलेल्या प्रवसाचा शोध सुरू आहे. मात्र अद्याप त्याचा शोध लागलेला नाही आहे. मांडवा पोलिसांना याबाबत रो रो प्रशासनाने माहिती दिली आहे. रो रो मधून प्रवाशाने उडी मारण्याची ही पहिलीच घटना आहे.
मुंबई येथून सोमवार दि.९ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी आठ वाजता सुटलेली रो-रो बोट मांडवाकडे रवाना झाली होती. हि बोट मांडवा जेट्टी जवळपास आल्यानंतर एका प्रवाशाने कोणत्यातरी अज्ञात कारणाने समुद्राच्या पाण्यात उडी मारली. प्रवासी हा पाण्यात बेपत्ता झाला आहे. रो-रो कर्मचाऱ्यांनी मांडवा पोलिसांना कळविले असता मांडवा पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन बेपत्ता प्रवाशाचा शोध घेत आहेत. याबाबत अधिक तपास मांडवा पोलीस करत असल्याने अधिक माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.
काही महिन्यांपूर्वी अजंठा बोटी मधून एका प्रवाशाने उडी मारल्याची घटना घडली होती. तसेच एक प्रवासी पडल्याची घटनाही घडली होती. त्यावेळी प्रवाशांना वाचविण्यात यश आले होते. मात्र रो रो मधून प्रवाशाने उडी मारल्याची ही पहिलीच घटना घडली आहे. त्यामुळे रो रो प्रशासनाला या घटनेनंतर पुन्हा अशी घटना घडू नये दृष्टीने पावले उचलावी लागणार आहे.