रायगड पोलिस ठरले सर्वोत्कृष्ठ राज्यात पोलिस दल म्हणून अव्वल

By निखिल म्हात्रे | Published: January 9, 2023 07:38 PM2023-01-09T19:38:59+5:302023-01-09T19:39:06+5:30

पोलिसांच्या कामांचे स्वरुप आमूलाग्र पद्धतीने बदलत असताना प्रशिक्षण व प्रबोधनाच्या माध्यमातून पोलिस दल कार्यप्रणालीत कालानुरुप बदल घडवित असते.

Raigad Police emerged as the best police force in the state | रायगड पोलिस ठरले सर्वोत्कृष्ठ राज्यात पोलिस दल म्हणून अव्वल

रायगड पोलिस ठरले सर्वोत्कृष्ठ राज्यात पोलिस दल म्हणून अव्वल

googlenewsNext

अलिबाग - पोलिसांच्या कामांचे स्वरुप आमूलाग्र पद्धतीने बदलत असताना प्रशिक्षण व प्रबोधनाच्या माध्यमातून पोलिस दल कार्यप्रणालीत कालानुरुप बदल घडवित असते. पोलिस महासंचालक कार्यालयाकडून २०२१ या वर्षात सर्वोत्कृष्ठ पोलिस घटक म्हणून रायगड पोलिसांना दुसरा क्रमांक मिळाला आहे.  

राज्यातील पोलीस घटकांची कार्यक्षमता आणि गुन्हे प्रतिबंध तसेच त्यांची उकल कालबद्ध पद्धतीने करणे, पारदर्शकतेने करणे असे निकष या सन्मानासाठी ठरविलेले आहेत. त्याने पोलिस दल प्रोत्साहितही होते. जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२१ या वर्षासाठी पोलिस महासंचालक कार्यालयाने वरील निकषांसोबतच अन्य निकषही रायगड पोलिसांसाठी लावले. मुंबईसारख्या अतिमहत्वाच्या महानगराशी आणि नवी मुंबईशीही नाते सांगणाऱ्या रायगडमधी पोलिसांना क्लिष्ट प्रकरणांना सामोरे जावे लागते. त्यात गुन्हेगारी प्रतिबंध, तपास, कायदा व सुव्यवस्थायांच्याशी संबंधित प्रकरणे असतात. पोलिसांशी संबंधित पेन्शन प्रकरणे, बदल्या आदी बाबतीतही रायगड पोलिसांचे काम समाधानकारक आहे.

राज्यातील अनेक पोलिस युनिट अर्थात जिल्हा, प्रांतानुसार कार्यरत असणारे पोलिस कसे काम करतात हेही या निमित्ताने गृहमंत्रालयादि संबंधित यंत्रणांमधील धोरणकर्त्यांना या निमित्ताने कळते. रायगड पोलिसांचे काम वाखाणण्यासारखे झाले असून सर्वोत्कृष्ठ पोलिस घटक पुरस्कारावर त्यांनी शिक्कामोर्तब केले आहे. यापुर्वीही २०२० मध्ये हा सन्मान रायगड पोलिसांना मिळाला होता.

रायगड पोलिसांच्या या सन्मानाची परंपरा कायम राखल्याबद्दल तत्कालीन पोलिस अधिक्षक अशोक दुधे, अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे तसेच पोलिस दलाचे अभिनंदन. पोलिसांसंदर्भातील राष्ट्रीय तसेच आंतरराष्टीय स्तरावरील अभ्यास आणि संशोधनाचा वापर आम्ही भविष्यात कार्यक्षमता, कर्तव्यकठोरता आणि संवेदनाशीलता वाढीस लागावी म्हणून करू.
- सोमनाथ घार्गे, जिल्हा पोलिस अधीक्षक.

रायगड पोलिसांनी पार केलेले काही महत्वाचे टप्पे 

गुन्हे तपास, महिलांसंबंधित गुन्ह्यांचा कालबद्ध तपास, समन्स-वॉरंट बजावणी, न्यायालयात आरोप सिद्धता, रस्ते अपघात व मृत्यूदर घट, दारुबंदी, जुगार प्रतिबंध, सराईत गुन्हेगारांना प्रतिबंध, प्रलंबित पासपोर्ट प्रकरणे, हरवलेल्या व्यक्ती, विभागीय चौकशीतील तत्परता व प्रामाणिकपणा.

Web Title: Raigad Police emerged as the best police force in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :alibaugअलिबाग