शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
5
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
6
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
7
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
8
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
9
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
10
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
11
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
12
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
14
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
15
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
16
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
17
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
18
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
19
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
20
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड

रायगड पोलिस ठरले सर्वोत्कृष्ठ राज्यात पोलिस दल म्हणून अव्वल

By निखिल म्हात्रे | Published: January 09, 2023 7:38 PM

पोलिसांच्या कामांचे स्वरुप आमूलाग्र पद्धतीने बदलत असताना प्रशिक्षण व प्रबोधनाच्या माध्यमातून पोलिस दल कार्यप्रणालीत कालानुरुप बदल घडवित असते.

अलिबाग - पोलिसांच्या कामांचे स्वरुप आमूलाग्र पद्धतीने बदलत असताना प्रशिक्षण व प्रबोधनाच्या माध्यमातून पोलिस दल कार्यप्रणालीत कालानुरुप बदल घडवित असते. पोलिस महासंचालक कार्यालयाकडून २०२१ या वर्षात सर्वोत्कृष्ठ पोलिस घटक म्हणून रायगड पोलिसांना दुसरा क्रमांक मिळाला आहे.  

राज्यातील पोलीस घटकांची कार्यक्षमता आणि गुन्हे प्रतिबंध तसेच त्यांची उकल कालबद्ध पद्धतीने करणे, पारदर्शकतेने करणे असे निकष या सन्मानासाठी ठरविलेले आहेत. त्याने पोलिस दल प्रोत्साहितही होते. जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२१ या वर्षासाठी पोलिस महासंचालक कार्यालयाने वरील निकषांसोबतच अन्य निकषही रायगड पोलिसांसाठी लावले. मुंबईसारख्या अतिमहत्वाच्या महानगराशी आणि नवी मुंबईशीही नाते सांगणाऱ्या रायगडमधी पोलिसांना क्लिष्ट प्रकरणांना सामोरे जावे लागते. त्यात गुन्हेगारी प्रतिबंध, तपास, कायदा व सुव्यवस्थायांच्याशी संबंधित प्रकरणे असतात. पोलिसांशी संबंधित पेन्शन प्रकरणे, बदल्या आदी बाबतीतही रायगड पोलिसांचे काम समाधानकारक आहे.

राज्यातील अनेक पोलिस युनिट अर्थात जिल्हा, प्रांतानुसार कार्यरत असणारे पोलिस कसे काम करतात हेही या निमित्ताने गृहमंत्रालयादि संबंधित यंत्रणांमधील धोरणकर्त्यांना या निमित्ताने कळते. रायगड पोलिसांचे काम वाखाणण्यासारखे झाले असून सर्वोत्कृष्ठ पोलिस घटक पुरस्कारावर त्यांनी शिक्कामोर्तब केले आहे. यापुर्वीही २०२० मध्ये हा सन्मान रायगड पोलिसांना मिळाला होता.

रायगड पोलिसांच्या या सन्मानाची परंपरा कायम राखल्याबद्दल तत्कालीन पोलिस अधिक्षक अशोक दुधे, अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे तसेच पोलिस दलाचे अभिनंदन. पोलिसांसंदर्भातील राष्ट्रीय तसेच आंतरराष्टीय स्तरावरील अभ्यास आणि संशोधनाचा वापर आम्ही भविष्यात कार्यक्षमता, कर्तव्यकठोरता आणि संवेदनाशीलता वाढीस लागावी म्हणून करू.- सोमनाथ घार्गे, जिल्हा पोलिस अधीक्षक.रायगड पोलिसांनी पार केलेले काही महत्वाचे टप्पे 

गुन्हे तपास, महिलांसंबंधित गुन्ह्यांचा कालबद्ध तपास, समन्स-वॉरंट बजावणी, न्यायालयात आरोप सिद्धता, रस्ते अपघात व मृत्यूदर घट, दारुबंदी, जुगार प्रतिबंध, सराईत गुन्हेगारांना प्रतिबंध, प्रलंबित पासपोर्ट प्रकरणे, हरवलेल्या व्यक्ती, विभागीय चौकशीतील तत्परता व प्रामाणिकपणा.

टॅग्स :alibaugअलिबाग