Mahad Building Collapse: महाड इमारत दुर्घटनेतील एक आराेपी फरार; न्यायालयाने सुनावली 30 ऑगस्टपर्यंत पाेलिस काेठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 04:14 PM2020-08-26T16:14:52+5:302020-08-26T17:08:31+5:30
सुमारे 10 वर्षातच तारिक गार्डन इमारत काेसळल्याने इमारतीच्या निकृष्ठ दर्जाच्या बांधकामाबाबत प्रश्न चिन्ह निर्माण करण्यात आले.
रायगड: महाड शहरातील तारिक गार्डन इमारत दुर्घटनेतील पाच दाेषींपैकी रायगड पाेलिसांनी एकाला अटक केली आहे. ठाणा-कळवा येथून सकाळी पावने पाच वाजता पाेलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. माणगाव न्यायालयात त्याला हजर केले असता न्यायालयाने त्याची 30 ऑगस्टपर्यंत पाेलिस काेठडीत रवानगी केली आहे.आरसीसी सल्लागार बाहुबली धमाने असे अटक केलेल्या आराेपीचे नाव आहे.
महाड शहरातील तारिक गार्डन इमारत 24 ऑगस्टराेजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास काेसळली हाेती. त्यामध्ये तब्बल 16 नागिरकांचा मृत्यू झाला, तर 9 नागरिक जखमी झाले आहे. सदरच्या घटनेने महाडमध्ये मृत्यूचे तांडव दिसत हाेेते. सुमारे 10 वर्षातच तारिक गार्डन इमारत काेसळल्याने इमारतीच्या निकृष्ठ दर्जाच्या बांधकामाबाबत प्रश्न चिन्ह निर्माण करण्यात आले.
निष्पाप जीवांच्या मृत्यूचे कारण बनलेल्या विकासक (बिल्डर) फारुक काझी, आरसीसी कन्सल्टंट बाहुबली धमाणे, वास्तू विशारद गाैरव शहा, महाड नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी दिपक जिंजाड, तत्कालीन अभियंता शशिकांत दिघे यांच्यावर सदाेष मनुष्यवधचा गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. रायगडचे पाेलिस अधिक्षक अनिल पारसकर यांनी विशेष पथक स्थापन करुन विविध ठिकाणी आराेपींचा शाेध घेण्यासाठी पाठवण्यात आले हाेते. ठाणे-कळवा येथून सकाळी पावने पाच वाजण्याच्या सुमारास बाहुबली धमाने याला अटक केली. माणगावच्या न्यायानयात त्याला हजर करण्यात आल्यानंतर न्यायालयाने त्याची 30 ऑगस्टपर्यंत पाेलिस काेठडीत रवानगी केली आहे.