रायगड पोलिसांकडून आरोपींना माहिती घेऊन पोलीस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस
By राजेश भोस्तेकर | Published: August 5, 2023 07:56 PM2023-08-05T19:56:33+5:302023-08-05T19:57:17+5:30
नितीन देसाई आत्महत्या गुन्ह्याच्या अनुषंगाने ईसीएल फायनांन्स कंपनी, एडलवाईज ग्रुप यांच्या व्यवस्थापकिय संचालक यांना नोटीस देवून विविध मुद्यांवर माहिती मागविण्यात आलेली असल्याची माहिती रायगड पोलिसांनी दिली आहे.
अलिबाग : नितीन देसाई आत्महत्या गुन्ह्याच्या अनुषंगाने ईसीएल फायनांन्स कंपनी, एडलवाईज ग्रुप यांच्या व्यवस्थापकिय संचालक यांना नोटीस देवून विविध मुद्यांवर माहिती मागविण्यात आलेली असल्याची माहिती रायगड पोलिसांनी दिली आहे. सदर माहिती दिनांक ८ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजेपर्यंत खालापुर पोलीस ठाणे येथे समक्ष हजर राहून सादर करण्याबाबत नोटीसद्वारे समज देण्यात आलेली आहे. एन. डी. स्टुडिओचे कायदेशीर सल्लागार, आर्थिक सल्लागार व अकाउंटन्ट यांचेकडुन सदर कर्ज प्रकरणाबाबत तपासिक अधिकारी हे अधिकची माहिती घेत आहेत.
गुन्ह्याच्या अनुषंगाने अद्यापपावेतो १५ साक्षीदारांकडे विचारपुस करून त्यांचे जबाब नोंदविले आहेत. गुन्हयाच्या तपासाकरीता उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मदतीला ०१ पोलीस निरीक्षक, ०३ सहा. पोलीस निरीक्षक व ०४ पोलीस अंमलदार हे तपास करत असल्याची माहिती प्रेस नोट देऊन पोलिसांनी दिली आहे.