रायगड डाक विभाग नवे खाते उघडण्यात अव्वल; ६० हजार १२५ नवीन खाती

By निखिल म्हात्रे | Published: April 4, 2024 07:46 PM2024-04-04T19:46:45+5:302024-04-04T19:47:59+5:30

महाराष्ट्र, गोवा राज्यांतील १० विभागांत मिळवले स्थान

Raigad Postal Department tops new account openings; 60 thousand 125 new accounts | रायगड डाक विभाग नवे खाते उघडण्यात अव्वल; ६० हजार १२५ नवीन खाती

रायगड डाक विभाग नवे खाते उघडण्यात अव्वल; ६० हजार १२५ नवीन खाती

अलिबाग : रायगड टपाल विभागाने वर्षभरात ६० हजार १२५ नवीन खाती उघडण्यात यश मिळवले आहे. उद्दिष्ट पूर्ततेचे हे प्रमाण १२८.७० टक्के इतके असून, या कामगिरीमुळे रायगड विभागाने महाराष्ट्र आणि गोवा राज्यांतील १० अव्वल टपाल विभागात स्थान मिळवले आहे.

टपाल विभागाने देश व राज्य पातळीवर २९ जानेवारी ते ३१ मार्च या कालावधीत बचतीच्या वेगवेगळ्या योजना सुरू करून नवीन खाते सुरू करण्यासाठी ‘नया साल, नया जोश’ नावाची स्पर्धा आयोजित केली होती. यामध्ये रायगड टपाल विभागाचे अधीक्षक सुनील थळकर यांनी स्थानिक जिल्हा टपाल अधीक्षक म्हणून काम करत कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देत विविध योजना राबवल्या.

६० हजार १२५ खाती उघडली
रायगड टपाल विभाग हा जरी ग्रामीण विभाग असला, तरी इथे शहराप्रमाणे कामगिरी करता येईल, अशी मानसिकता निर्माण केल्याने चालू आर्थिक वर्षात शहरी विभागाला मागे टाकत महाराष्ट्र व गोवा राज्यांत १० उत्कृष्ट टपाल विभागांत स्थान मिळवले आहे. स्पर्धेत रायगड डाक विभागाने १२८.७० टक्के टार्गेट पूर्ण करत ६० हजार १२५ नवीन खाती उघडली आहेत.

Web Title: Raigad Postal Department tops new account openings; 60 thousand 125 new accounts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.