अलिबाग : रायगड टपाल विभागाने वर्षभरात ६० हजार १२५ नवीन खाती उघडण्यात यश मिळवले आहे. उद्दिष्ट पूर्ततेचे हे प्रमाण १२८.७० टक्के इतके असून, या कामगिरीमुळे रायगड विभागाने महाराष्ट्र आणि गोवा राज्यांतील १० अव्वल टपाल विभागात स्थान मिळवले आहे.
टपाल विभागाने देश व राज्य पातळीवर २९ जानेवारी ते ३१ मार्च या कालावधीत बचतीच्या वेगवेगळ्या योजना सुरू करून नवीन खाते सुरू करण्यासाठी ‘नया साल, नया जोश’ नावाची स्पर्धा आयोजित केली होती. यामध्ये रायगड टपाल विभागाचे अधीक्षक सुनील थळकर यांनी स्थानिक जिल्हा टपाल अधीक्षक म्हणून काम करत कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देत विविध योजना राबवल्या.
६० हजार १२५ खाती उघडलीरायगड टपाल विभाग हा जरी ग्रामीण विभाग असला, तरी इथे शहराप्रमाणे कामगिरी करता येईल, अशी मानसिकता निर्माण केल्याने चालू आर्थिक वर्षात शहरी विभागाला मागे टाकत महाराष्ट्र व गोवा राज्यांत १० उत्कृष्ट टपाल विभागांत स्थान मिळवले आहे. स्पर्धेत रायगड डाक विभागाने १२८.७० टक्के टार्गेट पूर्ण करत ६० हजार १२५ नवीन खाती उघडली आहेत.