Raigad: पूरस्थितीच्या अनुषंगाने रायगड जिल्ह्यात बचाव पथक सज्ज
By राजेश भोस्तेकर | Published: July 19, 2023 12:11 PM2023-07-19T12:11:05+5:302023-07-19T12:11:23+5:30
Rain In Raigad: रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जाहीर झाल्याने रात्रीपासून अती मुसळधार पाऊस पडत आहे. जिल्ह्यातील नद्यानीही धोका पातळी ओलांडली असल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे.
- राजेश भोस्तेकर
अलिबाग - रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जाहीर झाल्याने रात्रीपासून अती मुसळधार पाऊस पडत आहे. जिल्ह्यातील नद्यानीही धोका पातळी ओलांडली असल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. या अनुषंगाने नागरिकांच्या मदतीसाठी बचाव पथक, आपदा मित्र, प्रशासन सज्ज झाले आहे. रोहा कोलाड येथील महेश सानप याचे पथक तैनात झाले आहे. बचाव कार्यासाठी बोटी घेऊन सदस्य सज्ज झाले आहेत.
रायगड जिल्ह्यातील कुंडलिका, अंबा, सावित्री, पाताळगंगा या नद्या तुंबडी भरून वाहू लागल्या आहेत. नद्याचे पाणी नागरी वस्तीत घुसले असल्याने लोकांच्या घरात पाणी शिरले आहेत. पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी प्रशासन तसेच खाजगी बचाव पथक हे सज्ज झाले आहे. पावसाचा जोर वाढत असल्याने पूरस्थिती अजून वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरड ग्रस्त गावातील नागरिकांनाही सुस्थळी हलविण्यात प्रशासनाने सुरुवात केली आहे.