Raigad: संभाजी भिडेंवर संभाजीराजे भडकले, सरकारलाही सुनावले खडेबोल, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2023 07:28 PM2023-08-02T19:28:12+5:302023-08-02T19:29:04+5:30
Raigad: शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे प्रमुथ संभाजी भिडे यांनी महात्मा गांधींबाबत केलेल्या विधानामुळे विविध क्षेत्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. तसेच विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसनेही या मुद्द्यावर विधिमंडळात आक्रमक भूमिका घेतली आहे.
शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे प्रमुथ संभाजी भिडे यांनी महात्मा गांधींबाबत केलेल्या विधानामुळे विविध क्षेत्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. तसेच विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसनेही या मुद्द्यावर विधिमंडळात आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, युवराज संभाजीराजे छत्रपती यांनीही संभाजी भिडेंविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. संभाजी भिडे हे महापुरुषांचा अपमान करत सुटले आहेत. सरकारने त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे.
संभाजी भिडे यांच्या वक्तव्यांवर प्रतिक्रिया देताना संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, हे सांगलीचे गृहस्थ आमच्या महापुरुषांचा अपमान करत सुटले आहेत. सरकार त्यांच्यावर कारवाई करत नाही. उलट ते आमच्या पक्षाचे नाहीत, असा खुलासा उपमुख्यमंत्री करत बसले आहेत. ते कुणाशी संबंधित आहेत हे आम्हाला माहीत नाही काय? सरकारने संभाजी भिडे यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे.
दरम्यान, संभाजी भिडेंच्या मुद्द्यावरून आज विधिमंडळातही गदारोळ झाला. तसेच संभाजी भिडेंवर अटकेची कारवाई व्हावी यासाठी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे.