Raigad: उरणच्या शासकीय इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोग, बालरोगतज्ज्ञांची कमतरता

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 05:28 PM2023-10-12T17:28:45+5:302023-10-12T17:29:09+5:30

Raigad: उरण परिसरातील दोन लाख नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या आणि दररोज उपचारासाठी येणाऱ्या गरिब-गरजू २५० बाह्य रुग्णांसाठी एकमेव आधार असलेल्या शासकीय इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाला सध्या काही गैरसोयींनी ग्रासले आहे.

Raigad: Shortage of gynaecologists, paediatricians in Government Indira Gandhi Rural Hospital, Uran | Raigad: उरणच्या शासकीय इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोग, बालरोगतज्ज्ञांची कमतरता

Raigad: उरणच्या शासकीय इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोग, बालरोगतज्ज्ञांची कमतरता

- मधुकर ठाकूर
उरण  - उरण परिसरातील दोन लाख नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या आणि दररोज उपचारासाठी येणाऱ्या गरिब-गरजू २५० बाह्य रुग्णांसाठी एकमेव आधार असलेल्या शासकीय इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाला सध्या काही गैरसोयींनी ग्रासले आहे.त्यामुळे उपचारासाठी येणाऱ्या गरीब-गरजू रुग्णांवर उपचार करण्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

वाढत्या औद्योगिक पसाऱ्यामुळे देशाची दुसरी आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाणाऱ्या उरणच्या दोन लाख नागरिकांना दररोज आरोग्य जपण्यासाठी कसरत करावी लागत आहे. उरणच्या शहरी व ग्रामीण जनतेसाठी उपयुक्त असणाऱ्या ३० खाटांच्या शासकीय इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय
सध्या स्त्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ज्ञ, वातानुकूलित शवागाराची कमतरता जाणवत आहे.या कमतरतेमुळे रुग्णालयाला अनेक गैरसोयींमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.मागील काही वर्षांपासून रुग्णालयात स्त्री रोग, बालरोगतज्ज्ञ नसल्याने उपचारासाठी येणाऱ्या गरीब-गरजू महिला व लहान मुले आदी रुग्णांवर उपचार करणे अवघड होत चालले आहे. तज्ञच नसल्याने महिलांच्या सिंझरिंग व लहान मुलांच्या अडचणीच्या ठरणाऱ्या केसेस अनेकदा उपचारासाठी पनवेल, नवीमुंबई, मुंबईकडे पाठविण्याची वेळ येते. त्यामुळे आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे अशा गरीब गरजूंना खासगी रुग्णालय अथवा बाहेर जाऊन उपचार करून घेणे आवाक्याबाहेर आणि महागडे ठरत आहे.

जेएनपीए अंतर्गत असलेल्या विविध बंदर व बंदरावर आधारित शेकडो कंटेनर यार्ड आणि कंपन्या उभारण्यात आलेल्या आहेत.तसेच  केंद्र, राज्य सरकारच्या अखत्यारीतील ओएनजीसी, बीपीसीएल, नौदल शस्त्रागार, करंजा मच्छीमार बंदर, करंजा टर्मिनल आदी प्रकल्पही अस्तित्वात आहेत. त्यामुळे अवजड वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. जेएनपीए बंदरातुनच  दररोज ३० हजार कंटेनर मालाची वाहतूक होत आहे.इतक्या प्रचंड प्रमाणात होणाऱ्या कंटेनर मालाच्या वाहतूकीमुळे दररोज अपघातांची संख्या मोठी आहे.अशा अपघातग्रस्त रुग्णही मोठ्या प्रमाणात उपचारासाठी दाखल केले जात असल्याने इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयावर त्याचा ताण वाढत चालला आहे.शिवाय अपघातात मृत्यू पावणारे अनेक मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात येतात.त्यामध्ये बेवारस, अनोळखी मृतदेहांचाही समावेश असतो.असे मृतदेह ठेवण्यासाठी शीतगृह,शवागारच उपलब्ध नसल्याने पोलिस, रुग्णालयाच्या डोकेदुखी तर आणखीनच भर पडते.महागड्या खासगी रुग्णालयाची फी परवडत नसल्याने परिसरातुन विविध आजारांवर उपचार करून घेण्यासाठी गरीब-गरजु रुग्ण येतात. मात्र रुग्णालयातील उणीवांमुळे गरीब रुग्णांना योग्य प्रकारे उपचार करणे शक्य होत नाही. त्यामुळे रुग्णालयातील उणीवा, गैरसोयींचा सर्वाधिक फटका दररोज रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या हजारो सर्वसामान्य गरीब-गरजु रुग्णांना बसत आहे.

मागील १५ वर्षांपासून उरणकरांच्या आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी १०० खाटांचे अद्यावत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यासाठी संघर्ष सुरू आहे.यासाठी जागाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.मात्र शासनाच्या अनागोंदी कारभारामुळे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल १५ वर्षांच्या संघर्षानंतरही अद्याप कागदावरच राहिले आहे.त्यामुळे मात्र शासन आणि उरणच्या आरोग्य सेवेबाबत परिसरातील नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

रुग्णालयात स्त्री रोग, बालरोगतज्ज्ञ नसल्याने उपचारासाठी येणाऱ्या विशेषतः गरीब-गरजू महिला व लहान मुले आदी रुग्णांवर उपचार करणे अवघड होत चालले आहे.यासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केला जात आहे.शवागृह नसल्याने मात्र बेवारस अनोळखी मृतदेह नवीमुंबई, पनवेल येथे पाठविले जातात.३०  खाटांचे रुग्णालय वाढत्या रुग्ण संख्येमुळे अपुरे पडत आहे.याममध्ये वाढ होण्याची आवश्यकता असल्याचे शासकीय इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक बाळासाहेब काळेल यांनी सांगितले.

Web Title: Raigad: Shortage of gynaecologists, paediatricians in Government Indira Gandhi Rural Hospital, Uran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.