शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

Raigad: उरणच्या शासकीय इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोग, बालरोगतज्ज्ञांची कमतरता

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 5:28 PM

Raigad: उरण परिसरातील दोन लाख नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या आणि दररोज उपचारासाठी येणाऱ्या गरिब-गरजू २५० बाह्य रुग्णांसाठी एकमेव आधार असलेल्या शासकीय इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाला सध्या काही गैरसोयींनी ग्रासले आहे.

- मधुकर ठाकूरउरण  - उरण परिसरातील दोन लाख नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या आणि दररोज उपचारासाठी येणाऱ्या गरिब-गरजू २५० बाह्य रुग्णांसाठी एकमेव आधार असलेल्या शासकीय इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाला सध्या काही गैरसोयींनी ग्रासले आहे.त्यामुळे उपचारासाठी येणाऱ्या गरीब-गरजू रुग्णांवर उपचार करण्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

वाढत्या औद्योगिक पसाऱ्यामुळे देशाची दुसरी आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाणाऱ्या उरणच्या दोन लाख नागरिकांना दररोज आरोग्य जपण्यासाठी कसरत करावी लागत आहे. उरणच्या शहरी व ग्रामीण जनतेसाठी उपयुक्त असणाऱ्या ३० खाटांच्या शासकीय इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयसध्या स्त्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ज्ञ, वातानुकूलित शवागाराची कमतरता जाणवत आहे.या कमतरतेमुळे रुग्णालयाला अनेक गैरसोयींमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.मागील काही वर्षांपासून रुग्णालयात स्त्री रोग, बालरोगतज्ज्ञ नसल्याने उपचारासाठी येणाऱ्या गरीब-गरजू महिला व लहान मुले आदी रुग्णांवर उपचार करणे अवघड होत चालले आहे. तज्ञच नसल्याने महिलांच्या सिंझरिंग व लहान मुलांच्या अडचणीच्या ठरणाऱ्या केसेस अनेकदा उपचारासाठी पनवेल, नवीमुंबई, मुंबईकडे पाठविण्याची वेळ येते. त्यामुळे आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे अशा गरीब गरजूंना खासगी रुग्णालय अथवा बाहेर जाऊन उपचार करून घेणे आवाक्याबाहेर आणि महागडे ठरत आहे.

जेएनपीए अंतर्गत असलेल्या विविध बंदर व बंदरावर आधारित शेकडो कंटेनर यार्ड आणि कंपन्या उभारण्यात आलेल्या आहेत.तसेच  केंद्र, राज्य सरकारच्या अखत्यारीतील ओएनजीसी, बीपीसीएल, नौदल शस्त्रागार, करंजा मच्छीमार बंदर, करंजा टर्मिनल आदी प्रकल्पही अस्तित्वात आहेत. त्यामुळे अवजड वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. जेएनपीए बंदरातुनच  दररोज ३० हजार कंटेनर मालाची वाहतूक होत आहे.इतक्या प्रचंड प्रमाणात होणाऱ्या कंटेनर मालाच्या वाहतूकीमुळे दररोज अपघातांची संख्या मोठी आहे.अशा अपघातग्रस्त रुग्णही मोठ्या प्रमाणात उपचारासाठी दाखल केले जात असल्याने इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयावर त्याचा ताण वाढत चालला आहे.शिवाय अपघातात मृत्यू पावणारे अनेक मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात येतात.त्यामध्ये बेवारस, अनोळखी मृतदेहांचाही समावेश असतो.असे मृतदेह ठेवण्यासाठी शीतगृह,शवागारच उपलब्ध नसल्याने पोलिस, रुग्णालयाच्या डोकेदुखी तर आणखीनच भर पडते.महागड्या खासगी रुग्णालयाची फी परवडत नसल्याने परिसरातुन विविध आजारांवर उपचार करून घेण्यासाठी गरीब-गरजु रुग्ण येतात. मात्र रुग्णालयातील उणीवांमुळे गरीब रुग्णांना योग्य प्रकारे उपचार करणे शक्य होत नाही. त्यामुळे रुग्णालयातील उणीवा, गैरसोयींचा सर्वाधिक फटका दररोज रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या हजारो सर्वसामान्य गरीब-गरजु रुग्णांना बसत आहे.

मागील १५ वर्षांपासून उरणकरांच्या आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी १०० खाटांचे अद्यावत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यासाठी संघर्ष सुरू आहे.यासाठी जागाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.मात्र शासनाच्या अनागोंदी कारभारामुळे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल १५ वर्षांच्या संघर्षानंतरही अद्याप कागदावरच राहिले आहे.त्यामुळे मात्र शासन आणि उरणच्या आरोग्य सेवेबाबत परिसरातील नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

रुग्णालयात स्त्री रोग, बालरोगतज्ज्ञ नसल्याने उपचारासाठी येणाऱ्या विशेषतः गरीब-गरजू महिला व लहान मुले आदी रुग्णांवर उपचार करणे अवघड होत चालले आहे.यासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केला जात आहे.शवागृह नसल्याने मात्र बेवारस अनोळखी मृतदेह नवीमुंबई, पनवेल येथे पाठविले जातात.३०  खाटांचे रुग्णालय वाढत्या रुग्ण संख्येमुळे अपुरे पडत आहे.याममध्ये वाढ होण्याची आवश्यकता असल्याचे शासकीय इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक बाळासाहेब काळेल यांनी सांगितले.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलRaigadरायगड