Raigad: १ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या मासेमारीसाठी ससुनडॉक, करंजा-मोरा-कसारा बंदरात हजारो मच्छीमार बोटींची लगबग 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2023 02:25 PM2023-07-22T14:25:06+5:302023-07-22T14:25:39+5:30

Raigad: एक जुनपासुन शासनाच्या खोल समुद्रातील पावसाळी मासेमारी बंदीनंतर ६२ दिवसांच्या विश्रांतीनंतर १ ऑगस्टपासुन मासेमारीला सुरुवात होणार आहे.पर्सियन नेट फिशिंग आणि खोल समुद्रातील मासेमारी या दोन्ही प्रकारातील मासेमारीला दहा दिवसांचाच अवधी उरला आहे.

Raigad: Thousands of fishing boats flock to Sassoondock, Karanja-Mora-Kasara harbor for fishing to begin from August 1 | Raigad: १ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या मासेमारीसाठी ससुनडॉक, करंजा-मोरा-कसारा बंदरात हजारो मच्छीमार बोटींची लगबग 

Raigad: १ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या मासेमारीसाठी ससुनडॉक, करंजा-मोरा-कसारा बंदरात हजारो मच्छीमार बोटींची लगबग 

googlenewsNext

- मधुकर ठाकूर
उरण - एक जुनपासुन शासनाच्या खोल समुद्रातील पावसाळी मासेमारी बंदीनंतर ६२ दिवसांच्या विश्रांतीनंतर १ ऑगस्टपासुन मासेमारीला सुरुवात होणार आहे.पर्सियन नेट फिशिंग आणि खोल समुद्रातील मासेमारी या दोन्ही प्रकारातील मासेमारीला दहा दिवसांचाच अवधी उरला आहे.सुरु होणार्‍या मासेमारीच्या पुर्वतयारीसाठी करंजा-मोरा-कसारा, ससुनडॉक बंदरात आतापासूनच हजारो मच्छीमार बोटींची लगबग सुरु झाली आहे.

समुद्रातील पर्ससीन नेट  फिशिंग आणि खोल समुद्रातील १ ऑगस्ट पासून सुरुवात होणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासुनच खवळलेला समुद्र शांत होतो.निरव शांत झालेल्या सागरात पर्ससीन नेट फिशिंगसाठी पोषक वातावरण असते. राज्यभरातील लाखो मच्छीमार खोल समुद्रातील आणि पर्ससीन फिशिंग या दोन प्रकारातील मासेमारी मोठ्या प्रमाणात करीत असतात.समुद्राच्या पुष्ठभागावरील ४ ते ५ कि.मी. परिघातील परिसरात ३५ ते ४० वाव खोलीपर्यत पर्सियन नेट फिशिंग केली जाते.गोल परिघातील सर्कलमध्ये शिशाच्या गोळ्या बांधलेली जाळी समुद्रात सोडली जातात. गोळाकार सर्कल सिल केल्यानंतर समुद्राच्या पुष्ठभागावरील  विविध प्रकारातील तरंगती मासळी अलगद जाळ्यात अडकली जाते. त्यानंतर यंत्राच्या साहाय्याने जाळी मच्छीमार बोटीत खेचली जातात. यामध्ये घोळ, काटबांगडे, मुशी, तकला, सुरमय,शिंगाला,तुणा, हलवा, तांब, पाखट यासारखी समुद्राच्या पुष्ठभागावरील तरंगती मासळी पकडली जाते.

खोल समुद्रातील मासेमारीसाठीही ससूनडॉक, कसारा, मोरा-करंजा बंदरात शेकडो मच्छीमारी ट्रॉलर्स सज्ज होऊ लागले आहेत.खोल समुद्रातील मासेमारीसाठी मच्छीमारांना ५० ते ७० वाव खोल समुद्रात जावे लागते.त्यासाठी एका ट्रिपसाठी १० ते १२ दिवस खर्ची घाऐलावे लागतात.खोल समुद्रातील एका ट्रिपसाठी अडिच ते तीन लाखापर्यत खर्च येतो. समुद्राच्या तळाशी असलेली सर्वच प्रकारची मासळी या पध्दतीत पकडली जाते.चांगल्या प्रतीची निर्यात करण्यायोगी असलेली मासळी खोल समुद्रातील मासेमारीत मिळत असल्याने या पध्दतीच्या मच्छीमारांची संख्या सर्वाधिक आहे.

पावसाळी बंदीनंतर दहा दिवसात मासेमारीला सुरुवात होणार आहे.यामुळे विविध बंदरात मच्छीमारांची जय्यत तयारी सुरू झाली आहे. मच्छीमार नौकांची यांत्रिक दुरुस्ती, रंगरंगोटी, जाळी आदी तत्सम कामांसाठी हजारो मच्छीमारांची विविध बंदरात लगबग सुरू झाली आहे.१ ऑगस्ट पासुनच मच्छीमार बोटींना डिझेलचा कोटा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे डिझेल भरण्यासाठी मच्छीमार बोटींची कसारा आणि ससुनडॉक बंदरात हळूहळू गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे. डिझेल,आवश्यक साधन-सामुग्री उपलब्ध होताच तात्काळ हजारो मच्छीमार बोटी १ ऑगस्टपासून मासेमारीसाठी रवाना होणार आहेत.

मासेमारीला सुरुवात होताच १०-१५ दिवसात मासळीची आवक वाढणार आहे.त्यामुळे पावसाळी बंदीनंतर मासळीचे वाढलेले भाव आटोक्यात येणार आहेत. खवय्यांनाही बाजारात विपुल प्रमाणात मासळी उपलब्ध होणार आहे . त्यामुळे खवय्यांनाही मासेमारी सुरू होण्याची प्रतीक्षा लागुन राहिली आहे.

Web Title: Raigad: Thousands of fishing boats flock to Sassoondock, Karanja-Mora-Kasara harbor for fishing to begin from August 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.