Raigad: कर्नाळा खिंडीत वाहतुक कोंडी ;तब्बल तीन नवरदेवाना कोंडीचा फटका
By वैभव गायकर | Published: May 21, 2023 04:22 PM2023-05-21T16:22:51+5:302023-05-21T16:23:29+5:30
Raigad: सकाळी 8.30 च्या सुमारास या मार्गावर मोठी वाहतुक कोंडी झाली होती.तब्बल एक ते दीड किमी पर्यंत वाहनांच्या रांगा यामुळे लागल्या होत्या.
- वैभव गायकर
पनवेल - मुंबई गोवा महामार्ग विशेषतः अपघातांसाठी प्रसिद्ध आहे.या मार्गावर कर्नाळा खंडित राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातुन रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम सुरु असताना रविवार दि.21 रोजी झालेल्या वाहतुक कोंडीमुळे तब्बल तीन नवरदेव अडकल्याने नवरदेवांसह त्यांच्या वर्हाड्याना निश्चित स्थळी पोहचण्यास उशीर झाला.
सकाळी 8.30 च्या सुमारास या मार्गावर मोठी वाहतुक कोंडी झाली होती.तब्बल एक ते दीड किमी पर्यंत वाहनांच्या रांगा यामुळे लागल्या होत्या.कर्नाळा खंडित नेहमीच अपघातांसाठी प्रसिद्ध राहिली आहे.मात्र याठिकाणी सुरु असलेल्या कामांमुळे एक लेन पूर्णपणे बंद केल्याने सुट्टीचा दिवस असल्याने वाहनांची वर्दळ वाढल्याने सकाळी काही तासातच मोठी वाहनांची गर्दी झाली.यापैकी एक नवरदेव कल्याण मधून अलिबाग कडे जाण्यास निघाला होता.11 वाजता लग्नांचा मुहूर्त निश्चित असल्याने नाईलाजास्तव नवरदेव बसलेली गाडी रस्त्याच्या उलट बाजुने नेऊन गर्दीतून मार्ग काढावा लागला.कर्नाळा खंडित कॉक्रीटीकरणाचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण करत आहे.एक मार्गिका बंद असल्याने दोम्ही मार्गावर मोठी वाहतुक कोंडी होत आहे.
मुंबई गोवा महामार्गावरून अलिबागच्या दिशेने जात असताना कर्नाळा खिंडीतून जाणे क्रमप्राप्त आहे.याशिवाय दुसरा कोणताच शॉर्टकट उपलब्ध नसल्याने रविवारी सुट्टीच्या दिवशी अनेक पर्यटक,लग्नाचे वर्हाडी याठिकाणी अडकले.