Raigad: ५६ व्या युवा महोत्सवात वीर वाजेकर महाविद्यालय प्रथम. मुंबई विद्यापीठाच्या अंतिम फेरीसाठी निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 04:53 PM2023-08-24T16:53:40+5:302023-08-24T16:54:05+5:30
Raigad: मातोश्री सुमती टिपणीस महाविद्यालय नेरळ -कर्जत येथे झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या ५६ व्या युवा महोत्सवामध्ये भारतीय लोकनृत्य प्रकारात उरण तालुक्यातील फुंडे येथील वीर वाजेकर महाविद्यालयाने स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.
उरण - मातोश्री सुमती टिपणीस महाविद्यालय नेरळ -कर्जत येथे झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या ५६ व्या युवा महोत्सवामध्ये भारतीय लोकनृत्य प्रकारात उरण तालुक्यातील फुंडे येथील वीर वाजेकर महाविद्यालयाने स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. नुकत्याच पार पडलेल्या व परीक्षक आणि प्रेक्षकांची मने जिंकून घेणाऱ्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या आदिवासी लोकनृत्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. रायगड झोनमध्ये लोकनृत्यामध्ये अव्वल ठरलेल्या फुंण्डे महाविद्यालयाची मुंबई विद्यापीठाच्या अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे.
या स्पर्धेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.जी. पवार, नृत्य दिग्दर्शक श्री. सचिन ठाकूर आणि त्यांची संपूर्ण टीम हरीश म्हात्रे, योगेश पाटणकर, धनंजय त्याचबरोबर सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. सुजाता पाटील व त्यांची संपूर्ण कमिटी यांचे मार्गदर्शन लाभले. या घवघवीत यशाबद्दल महाविद्यालय व स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.