रायगडाला गतवैभव परत मिळवून देणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2019 04:24 AM2019-06-03T04:24:16+5:302019-06-03T04:24:34+5:30

राजधानीवर जाऊन केली गड संवर्धनाच्या कामांची पाहणी

Raigad will get back the goodwill; Chief Minister Devendra Fadnavis Guilty | रायगडाला गतवैभव परत मिळवून देणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

रायगडाला गतवैभव परत मिळवून देणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

googlenewsNext

किल्ले रायगड/ दासगाव : स्वराजाच्या राजधानीचे जतन करून हा देशभक्तीचा जाज्वल्य इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. अनेक वर्षांत दुरुस्ती न झाल्याने स्वराज्याच्या राजधानीतील बऱ्याच ऐतिहासिक वास्तूंची पडझड झाली होती. मात्र, भारतीय पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली किल्ले रायगड विकास प्राधिकरणामार्फत राजधानीला तिचे गतवैभव परत मिळवून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. रविवारी मुख्यमंत्र्यांनी किल्ले रायगडावर जाऊन तेथे सुरू असलेल्या कामांची माहिती घेतली. त्या वेळी ते बोलत होते.

या वेळी मुख्यमंत्र्यांसमवेत किल्ले रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार छत्रपती संभाजी राजे, आमदार प्रवीण दरेकर, आमदार अनिकेत तटकरे, आमदार भरतशेठ गोगावले, रघुजीराजे आंग्रे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, कोकण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक निकेत कौशिक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, भारतीय पुरातत्त्व विभागाचे मुंबई निर्देशक बिपिनचंद्र नेगी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, रायगड किल्ल्यावरील पुरातन वास्तूंचे जतन व संवर्धन हे इतिहासाशी संधान साधून केले जात आहे. किल्ल्याच्या परिसरात पर्यटकांसाठी पायाभूत सुविधांची निर्मिती, रस्त्यांचे रुंदीकरण सुरू आहे. त्याशिवाय शिवसृष्टीसाठी लागणाºया २० एकर जमिनीची संपादन प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. गडावरील २२ तलावांमधील गाळ काढणे व गळती दुरुस्त करण्याचे काम केल्याने सध्या मुबलक पाण्याची उपलब्धता आहे, अशी माहिती या वेळी मुख्यमंत्र्यांना देण्यात आली.

पहिल्या टप्प्यात ५९ कोटींची संवर्धन कामे पूर्णत्वाकडे
छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून गेले वर्षभर संवर्धन आणि रायगड परिसर विकासाचे काम शासनाने हाती घेतले आहे. याकरिता शासनाने ६०६ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर केला असून पहिल्या टप्प्यात ५९ कोटी रुपयांची कामे हाती घेण्यात आली असून ही कामे पूर्णत्वाकडे आली आहेत. रायगडावरील नष्ट होत असलेल्या ऐतिहासिक वास्तूंचे जतन, चित दरवाजा ते हत्ती तलाव पायरीमार्ग दुरुस्ती, वीज व्यवस्था, गडावरील पिण्याच्या पाण्याची सुविधा, उत्खनन करून जुन्या वस्तू प्रकाशात आणणे या संवर्धनाच्या कामासह रायगड परिसरातील गावातील सुविधा, तेथील रस्ते, पाणी व्यवस्था आदी कामांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.

Web Title: Raigad will get back the goodwill; Chief Minister Devendra Fadnavis Guilty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.