- आविष्कार देसार्ईरायगड : अपुऱ्या आॅक्सिजनमुळे गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. मात्र यापुढे अशा घटना घडणार नाहीत याची खबरदारी जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. माणगाव तालुक्यामध्ये सुमारे २०० मेट्रिक टन क्षमतेचे आॅक्सिजन साठवणूक केंद्र उभारण्यात येणार आहे. रायगडसह रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याची गरज भागणार असल्याने रायगड जिल्हा हा प्राणवायू पुरवणारा जिल्हा ठरणार आहे.माणगाव येथे २०० मेट्रिक टन क्षमता असणारे आॅक्सिजन साठवणूक केंद्राला मंजुरी मिळाली आहे. कोकण विभागीय आयुक्त आण्णासाहेब मिसाळ यांनी जिल्हा प्रशासनाला याबाबत हिरवा कंदील दिला आहे. हे केंद्र उभारण्यात येत असल्याने आरोग्य यंत्रणेला आवश्यक असणाºया आॅक्सिजनचा पुरवठा जिल्ह्यातून होणार आहे. सध्या तळोजा येथून आॅक्सिजनचा पुरवठा होत आहे.आरोग्य क्षेत्राला ८० टक्के, औद्योगिक क्षेत्राला २० टक्के आॅक्सिजनचा पुरवठाआधी औद्योगिक क्षेत्रासाठी ८० टक्के आणि आरोग्य क्षेत्रासाठी २० टक्के आॅक्सिजनचा पुरवठा केला जात होता. मात्र कोरोनाच्या महामारीमुळे सरकारला आॅक्सिजनच्या गरजेमध्ये बदल करावे लागले आहेत. सरकारच्या नवीन नियमानुसार आरोग्य क्षेत्राला ८० टक्के आणि औद्योगिक क्षेत्राला २० टक्के आॅक्सिजनचा पुरवठा करण्यात येणार आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबतची घोषणा काहीच दिवसांपूर्वी केली आहे.रायगड जिल्ह्यातील सातत्याने वाढत्या आॅक्सिजनची गरज लक्षात घेत माणगाव येथे आॅक्सिजन साठवणूक केंद्र उभारण्यात येणार आहे. कोकण आयुक्तांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. हे आॅक्सिजन साठवणूक केंद्र जिल्ह्यासाठी खूपच चांगले ठरणार आहे.- निधी चौधरी, जिल्हाधिकारीकोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांना आॅक्सिजनची गरज सातत्याने भासत आहे. जिल्ह्यातच आॅक्सिजनचे केंद्र निर्माण होत असल्याने जिल्ह्याच्या हिताचे आहे. सुमारे २०० मेट्रिक टन आॅक्सिजन साठवण्यात येणार असल्याने रायगड जिल्ह्यासह रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याची गरज भागणार आहे. लवकरच या कामाला सुरुवात होईल.- डॉ. सुहास माने, जिल्हा शल्यचिकित्सक, रायगड
रायगड ठरणार आता प्राणवायू पुरवणारा जिल्हा; आरोग्य क्षेत्राला ८० टक्के पुरवठा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 1:45 AM