रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी पदाचा डॉ. किरण पाटील यांनी पदभार स्विकारला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 02:48 PM2020-07-24T14:48:27+5:302020-07-24T14:53:36+5:30
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला भूमित जनतेची सेवा करायला मिळणे, या पेक्षा मोठे भाग्य काय असेल, असे डॉ. किरण पाटील यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.
रायगड : जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार डॉ. किरण पाटील यांनी शुक्रवारी स्विकारला. तत्कालीन मुख्यकार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांनी पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. सकाळपासूनच विविध राजकीय पक्षाचे प्रमुख, प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी यांनी संघटनेचे प्रतिनीधी यांनी डॉ. किरण पाटील यांची भेट घेतली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला भूमित जनतेची सेवा करायला मिळणे, या पेक्षा मोठे भाग्य काय असेल, असे डॉ. किरण पाटील यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले. तळागाळातील नागरिकांपर्यंत विविध योजनांचा लाभ पोहोचवून त्यांचा विकास करणे यावर लक्ष केंद्रीत करणार आहे.
कोरोनाचे संकट जिल्ह्यावर वाढत आहे. त्याला रोखण्यासाठी सर्वांचेच योगदान महत्वाचे आहे. यासाठी सर्वांना विश्वासात घेऊन काम करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, डॉ. किरण पाटील हे याआधी मंत्रालायमध्ये मुख्य सचिव यांच्या कार्यालयात उपसचिव पदावर कार्यरत होते. तेथील कामाचा, अनुभवाचा आणि संर्पकाचा जिल्ह्यासाठी निश्चितच फायदा होणार आहे.
आणखी बातम्या...
CoronaVirus News : कोरोनावरील इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या महिलेला अटक
इराणच्या पॅसेंजर विमानाजवळ आली दोन अमेरिकन लढाऊ विमाने, थोडक्यात मोठा अपघात टळला
"छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला असता तर तिथेच राजीनामा दिला असता"
बापरे! पत्नीचे 14 जणांसोबत शारीरिक संबंध; पतीने पाठवली सर्वांना कायदेशीर नोटीस अन्...
मृत्यूनंतरही आठ लोकांसाठी ठरला फरिश्ता; २७ वर्षीय तरुणाचे अवयवदान