- जयंत धुळप अलिबाग: जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवर मदत व बचाव कार्यासाठी तसेच संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी साहाय्यभूत ठरणारी आधुनिक साधने जिल्ह्यातील २४ समुद्रकिनारी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आली आहेत. याची माहिती रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.रायगडच्या समुद्रकिनारी राज्या-परराज्यातील पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात. अनेकदा समुद्राच्या भरती-ओहोटीचा अंदाज न आल्याने जीवावर बेतणारे प्रसंग या किनाºयावर घडले आहेत. त्यातून पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. पर्यटक सुरक्षा अभियानांतर्गत ७८ लाख रुपयांच्या निधीतून ही साधने आणण्यात आली आहेत. सद्य:स्थितीत पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी अशा प्रकारे संरक्षण यंत्रणा उभी करण्यात रायगड जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे.रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी या आधुनिक साधनांची पाहणी करून माहिती घेतल्यानंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रमुख तथा जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी ही साधने तैनात केली आहेत. जिल्ह्यातील अलिबाग, मांडवा, आक्षी, नागाव, किहीम, रेवदंडा, कोर्ले, मुरुड- जंजिरा, जलदुर्ग, काशीद, श्रीवर्धन, हरिहरेश्वर, दिवेआगर, सासवणे, आवास, थळ, वरसोली, रांजणपाडा डावली, मिळकतखार, कोप्रोली बोडणी, आदगाव, वेळास आगर, घारापुरी, नागाव पिरवाडी आदी २४ समुद्रकिनारी ही सुरक्षा साधने तैनात केली आहेत.परिणामी, येत्या काळात समुद्रात बुडण्याच्या दुर्घटनांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे. दरम्यान, समुद्रकिनारी येणाºया पर्यटकांनी आपल्या स्वत:च्या सुरक्षिततेसाठी आपत्ती निवारण पथकास सहकार्य करावे, त्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने केले गेले आहे.दोन टप्प्यांत साधनसामग्रीचे वितरणपहिल्या टप्प्यात मेगाफोन, दुर्बीण, टॉर्च, दोरखंड, लाइफ जॅकेट, फायबर स्ट्रेचर, स्कुबा ड्रायव्हिंग सेट, जीवरक्षक रिंग, सायरन, उलन ब्लँकेट, सर्चलाईट आदी साधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तर दुसºया टप्प्यात रेस्क्यू ट्यूब, रेस्कू कॅन, थ्रो बॅग, जीवरक्षकांसाठी पोषाख, सर्फ रेस्क्यू बोर्ड आदी सामुग्री उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच समुद्रकिनाºयांवर २५ जीवरक्षक नेमून त्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले आहे.मुरुडच्या दुर्घटनेनंतर पर्यटक सुरक्षा अभियानपुण्यातील अबेदा इनामदार महाविद्यालयातील १४ विद्यार्थ्यांचा मुरुडच्या समुद्रात बुडून मृत्यू झाला होता. अशा प्रकारच्या घटना वारंवार घडू नये, यासाठी शासनाने पर्यटकांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेऊन जिल्ह्यातील समुद्रकिनाºयांवर मदत व बचावकार्यासाठी साहित्य पुरवण्याची घोषणा करण्यात आली होती.पर्यटकांच्या सुरक्षा तसेच बचावकार्यासाठी आवश्यक विविध ११ साधने आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून संबंधित ग्रामपंचायती आणि नगरपालिकांना उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
रायगडचे २४ किनारे आपत्ती निवारणास सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2019 4:27 AM