चौकशी नंबर बंद झाल्याने रेल्वे प्रवाशांचे हाल, आॅनलाइन चौकशी नंबर कायम नॉटरिचेबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 03:03 AM2017-10-23T03:03:47+5:302017-10-23T03:03:50+5:30

Railway passengers' closure due to closure of inquiry no., Online inquiry no | चौकशी नंबर बंद झाल्याने रेल्वे प्रवाशांचे हाल, आॅनलाइन चौकशी नंबर कायम नॉटरिचेबल

चौकशी नंबर बंद झाल्याने रेल्वे प्रवाशांचे हाल, आॅनलाइन चौकशी नंबर कायम नॉटरिचेबल

Next

सिकंदर अनवारे
दासगाव : कोकण रेल्वेचे महाडमध्ये वीर रेल्वेस्थानक आहे. महाड शहरापासून सुमारे १५ कि.मी. लांब असणारे हे रेल्वेस्थानक तालुक्यातील सर्वच ग्रामीण भागांना प्रवासासाठी गैरसोईचे आहे. वीर रेल्वेस्थानकात सुरुवातीपासून चौकशीसाठी असलेला २७००५५ हा दूरध्वनी क्रमांक बंद झाल्याने, रेल्वे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. सध्याच्या स्थितीत रेल्वे प्रशासनाने रेल्वेसंदर्भात माहितीसाठी आॅनलाइन चौकशी नंबर सुरू केला आहे. मात्र, तोदेखील कायम बंद आहे.
मुंबई-गोवा महामार्गालगत असणारे वीर रेल्वेस्थानक महाडसाठी आहे. महाडपासून लांब असल्यामुळे हे स्थानक महाडकरांसाठी असून नसल्यासारखे आहे. रात्री-अपरात्री येणाºया गाड्या, दोन-तीन तासांच्या विलंबाने चालणाºया गाड्या, अशी कोकण रेल्वेची अवस्था असल्यामुळे कोकण रेल्वे प्रवासासाठी चौकशी क्रमांक महत्त्वपूर्ण होता. गेले वर्षभरापासून हा क्रमांक बंद आहे. प्रवाशांना गाडीची वेळ अगर चौकशीसाठी १५ कि.मी. दूर रेल्वेस्थानकात जाण्याशिवाय पर्याय राहत नाही. याचा फ टका प्रवाशांना बसत असून, उशिरा येणाºया गाड्यांची वाट पाहत तासन्तास रेल्वेस्थानकात बसावे लागत आहे.
कोकण रेल्वेचे वीर रेल्वेस्थानक सुरू झाल्यानंतर त्याच वेळी या स्थानकात २७००५५ हा दूरध्वनी क्रमांक सुरू करण्यात आला. गेल्या एक वर्षापासून हा क्रमांक बंद करण्यात आला. रेल्वे प्रशासन हा दूरध्वनी क्रमांक चौकशीसाठी असल्याचे मानण्यास तयार नसून, हा नंबर कार्यालयीन कामकाज तसेच अत्यावश्यक सेवेसाठी होता; परंतु सुरुवातीपासून बंद होईपर्यंत या क्रमांकाचा वीर रेल्वेस्थानकात चौकशीसाठीच वापर करण्यात येत होता. हा क्रमांक बंद केल्यानंतर या वीर रेल्वेस्थानकामध्ये पुन्हा दुसºया क्रमांकाचा दूरध्वनी क्रमांक २७००५५ सुरू करण्यात आला. यावर अगर एखाद्या प्रवाशांने चौकशीसाठी फोन लावला, तर हा क्रमांक कार्यालयीन आहे. चौकशीसाठी नाही. चौकशीसाठी आॅनलाइन सुविधा सुरू आहे, असे उत्तर देण्यात येते. यासंदर्भात रत्नागिरी कोकण रेल्वे कार्यालयाशी संपर्क साधला असता, कोकण रेल्वेचे अधिकारी व्ही. बी. निकम यांनी जुने नंबर हे जे स्टेशनवर होते ते चौकशीसाठी नव्हते. स्टेशनमध्ये एखादी दुर्घटना घडली, तर अन्य ठिकाणी संपर्क साधता यावा, यासाठी होते. १८००२३३१३३२ जो कॉल सेंटर आॅनलाइन नंबर आहे असे सांगितले. सध्या या मार्गावर गाड्यांची संख्या वाढल्यामुळे फोनवर संपर्क केल्याने स्टेशनमास्तर जर फोन घेत बसला, तर कामावर भरपूर परिणाम होतात.
>वीर स्थानक महाडकरांसाठी महत्त्वाचे
महाड तालुक्यातील खेड्या-पाड्यातील मोठ्या संख्येने नागरिक कोकण रेल्वेने प्रवास करतात. तसेच महाड औद्योगिक वसाहतीतील मजूरवर्गही मोठ्या संख्येने कोकण रेल्वेने प्रवास करतो. महाड तालुक्यातील नागरिकांसाठी जवळचे तसेच महत्त्वाचे वीर रेल्वेस्थानक आहे. दर आठवड्याला थांबणारी अजमेर-मरुसागर या गाडीमधून मोठ्या संख्येने महाड तालुक्यातील प्रवासी प्रवास करतात. तसेच रात्रीच्या थांबणाºया दोन गाड्या तुतारी एक्स्प्रेस यामधूनही महाडमधील नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रवास होतो. अशा वेळी चौकशीनंबर बंद असल्याचा मोठ्या प्रमाणात फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे. सर्वात महत्त्वाचे रात्रीच्या उशिरा धावणाºया गाड्यांची चौकशी महत्त्वाची आहे. मात्र, या चौकशी बंद केलेल्या दूरध्वनीमुळे रेल्वे प्रवाशांमध्ये रेल्वे प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त होत आहे.
>चौकशीसाठी असलेला आॅनलाइन नंबर नेहमी बंद
वीर रेल्वेस्थानकातून दर दिवशी अप ३० तर डाउन ३० अशा ६० गाड्या धावतात. मात्र, यामधून रत्नागिरी-दादर, सकाळी ९ वा.ची सावंतवाडी-दिवा संध्याकाळी ४ वा. तर रात्रीची सावंतवाडी-दादर, १.२० मि. (तुतारी एक्स्प्रेस) अशा मुंबई जाणाºया तीन गाड्या, तर मुंबईहून कोकणात, मडगाव, दुसरी दादर-रत्नागिरी संध्याकाळी ८ वाजताची तर दादर-सावंतवाडी (तुतारी एक्स्प्रेस) अशा सहा गाड्यांचा थांबा दर दिवशी वीर रेल्वेस्थानकात आहे, तर दर आठवड्याच्या सोमवारी अजमेरला जाणारी व तीच परतीच्या प्रवासाला शनिवारी वीर रेल्वेस्थानकात थांबतात. मात्र, नेहमी या वीर रेल्वेस्थानकात थांबणाºया पॅसेंजर लोकल गाड्या असल्यामुळे मुंबई तसेच रत्नागिरी, सावंतवाडीवरून निघाल्यानंतर ठिकठिकाणी रेल्वेस्थानकांत थांबवून अन्य गाड्यांना क्रॉसिंग देण्यात येतो. यामुळे गाड्या दर दिवशी वेळेवर नसतातच. १ ते २ तास नेहमी उशिरा धावतात. मात्र, चौकशी नंबर बंद केल्याने व आॅनलाइन नंबर बंद असल्याने प्रवाशांना गाड्यांच्या वेळेअगोदर स्थानकात जाऊन गाड्यांची दोन-दोन तास वाट पाहावी लागते. हा चौकशी नंबर बंद केल्याने त्याचा मोठा फटका रेल्वे प्रवाशांना बसला आहे. मात्र, मोठ्या प्रमाणात पुन्हा स्थानकात चौकशी नंबर सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Web Title: Railway passengers' closure due to closure of inquiry no., Online inquiry no

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.