शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

चौकशी नंबर बंद झाल्याने रेल्वे प्रवाशांचे हाल, आॅनलाइन चौकशी नंबर कायम नॉटरिचेबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 3:03 AM

सिकंदर अनवारेदासगाव : कोकण रेल्वेचे महाडमध्ये वीर रेल्वेस्थानक आहे. महाड शहरापासून सुमारे १५ कि.मी. लांब असणारे हे रेल्वेस्थानक तालुक्यातील सर्वच ग्रामीण भागांना प्रवासासाठी गैरसोईचे आहे. वीर रेल्वेस्थानकात सुरुवातीपासून चौकशीसाठी असलेला २७००५५ हा दूरध्वनी क्रमांक बंद झाल्याने, रेल्वे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. सध्याच्या स्थितीत रेल्वे प्रशासनाने रेल्वेसंदर्भात माहितीसाठी आॅनलाइन चौकशी ...

सिकंदर अनवारेदासगाव : कोकण रेल्वेचे महाडमध्ये वीर रेल्वेस्थानक आहे. महाड शहरापासून सुमारे १५ कि.मी. लांब असणारे हे रेल्वेस्थानक तालुक्यातील सर्वच ग्रामीण भागांना प्रवासासाठी गैरसोईचे आहे. वीर रेल्वेस्थानकात सुरुवातीपासून चौकशीसाठी असलेला २७००५५ हा दूरध्वनी क्रमांक बंद झाल्याने, रेल्वे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. सध्याच्या स्थितीत रेल्वे प्रशासनाने रेल्वेसंदर्भात माहितीसाठी आॅनलाइन चौकशी नंबर सुरू केला आहे. मात्र, तोदेखील कायम बंद आहे.मुंबई-गोवा महामार्गालगत असणारे वीर रेल्वेस्थानक महाडसाठी आहे. महाडपासून लांब असल्यामुळे हे स्थानक महाडकरांसाठी असून नसल्यासारखे आहे. रात्री-अपरात्री येणाºया गाड्या, दोन-तीन तासांच्या विलंबाने चालणाºया गाड्या, अशी कोकण रेल्वेची अवस्था असल्यामुळे कोकण रेल्वे प्रवासासाठी चौकशी क्रमांक महत्त्वपूर्ण होता. गेले वर्षभरापासून हा क्रमांक बंद आहे. प्रवाशांना गाडीची वेळ अगर चौकशीसाठी १५ कि.मी. दूर रेल्वेस्थानकात जाण्याशिवाय पर्याय राहत नाही. याचा फ टका प्रवाशांना बसत असून, उशिरा येणाºया गाड्यांची वाट पाहत तासन्तास रेल्वेस्थानकात बसावे लागत आहे.कोकण रेल्वेचे वीर रेल्वेस्थानक सुरू झाल्यानंतर त्याच वेळी या स्थानकात २७००५५ हा दूरध्वनी क्रमांक सुरू करण्यात आला. गेल्या एक वर्षापासून हा क्रमांक बंद करण्यात आला. रेल्वे प्रशासन हा दूरध्वनी क्रमांक चौकशीसाठी असल्याचे मानण्यास तयार नसून, हा नंबर कार्यालयीन कामकाज तसेच अत्यावश्यक सेवेसाठी होता; परंतु सुरुवातीपासून बंद होईपर्यंत या क्रमांकाचा वीर रेल्वेस्थानकात चौकशीसाठीच वापर करण्यात येत होता. हा क्रमांक बंद केल्यानंतर या वीर रेल्वेस्थानकामध्ये पुन्हा दुसºया क्रमांकाचा दूरध्वनी क्रमांक २७००५५ सुरू करण्यात आला. यावर अगर एखाद्या प्रवाशांने चौकशीसाठी फोन लावला, तर हा क्रमांक कार्यालयीन आहे. चौकशीसाठी नाही. चौकशीसाठी आॅनलाइन सुविधा सुरू आहे, असे उत्तर देण्यात येते. यासंदर्भात रत्नागिरी कोकण रेल्वे कार्यालयाशी संपर्क साधला असता, कोकण रेल्वेचे अधिकारी व्ही. बी. निकम यांनी जुने नंबर हे जे स्टेशनवर होते ते चौकशीसाठी नव्हते. स्टेशनमध्ये एखादी दुर्घटना घडली, तर अन्य ठिकाणी संपर्क साधता यावा, यासाठी होते. १८००२३३१३३२ जो कॉल सेंटर आॅनलाइन नंबर आहे असे सांगितले. सध्या या मार्गावर गाड्यांची संख्या वाढल्यामुळे फोनवर संपर्क केल्याने स्टेशनमास्तर जर फोन घेत बसला, तर कामावर भरपूर परिणाम होतात.>वीर स्थानक महाडकरांसाठी महत्त्वाचेमहाड तालुक्यातील खेड्या-पाड्यातील मोठ्या संख्येने नागरिक कोकण रेल्वेने प्रवास करतात. तसेच महाड औद्योगिक वसाहतीतील मजूरवर्गही मोठ्या संख्येने कोकण रेल्वेने प्रवास करतो. महाड तालुक्यातील नागरिकांसाठी जवळचे तसेच महत्त्वाचे वीर रेल्वेस्थानक आहे. दर आठवड्याला थांबणारी अजमेर-मरुसागर या गाडीमधून मोठ्या संख्येने महाड तालुक्यातील प्रवासी प्रवास करतात. तसेच रात्रीच्या थांबणाºया दोन गाड्या तुतारी एक्स्प्रेस यामधूनही महाडमधील नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रवास होतो. अशा वेळी चौकशीनंबर बंद असल्याचा मोठ्या प्रमाणात फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे. सर्वात महत्त्वाचे रात्रीच्या उशिरा धावणाºया गाड्यांची चौकशी महत्त्वाची आहे. मात्र, या चौकशी बंद केलेल्या दूरध्वनीमुळे रेल्वे प्रवाशांमध्ये रेल्वे प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त होत आहे.>चौकशीसाठी असलेला आॅनलाइन नंबर नेहमी बंदवीर रेल्वेस्थानकातून दर दिवशी अप ३० तर डाउन ३० अशा ६० गाड्या धावतात. मात्र, यामधून रत्नागिरी-दादर, सकाळी ९ वा.ची सावंतवाडी-दिवा संध्याकाळी ४ वा. तर रात्रीची सावंतवाडी-दादर, १.२० मि. (तुतारी एक्स्प्रेस) अशा मुंबई जाणाºया तीन गाड्या, तर मुंबईहून कोकणात, मडगाव, दुसरी दादर-रत्नागिरी संध्याकाळी ८ वाजताची तर दादर-सावंतवाडी (तुतारी एक्स्प्रेस) अशा सहा गाड्यांचा थांबा दर दिवशी वीर रेल्वेस्थानकात आहे, तर दर आठवड्याच्या सोमवारी अजमेरला जाणारी व तीच परतीच्या प्रवासाला शनिवारी वीर रेल्वेस्थानकात थांबतात. मात्र, नेहमी या वीर रेल्वेस्थानकात थांबणाºया पॅसेंजर लोकल गाड्या असल्यामुळे मुंबई तसेच रत्नागिरी, सावंतवाडीवरून निघाल्यानंतर ठिकठिकाणी रेल्वेस्थानकांत थांबवून अन्य गाड्यांना क्रॉसिंग देण्यात येतो. यामुळे गाड्या दर दिवशी वेळेवर नसतातच. १ ते २ तास नेहमी उशिरा धावतात. मात्र, चौकशी नंबर बंद केल्याने व आॅनलाइन नंबर बंद असल्याने प्रवाशांना गाड्यांच्या वेळेअगोदर स्थानकात जाऊन गाड्यांची दोन-दोन तास वाट पाहावी लागते. हा चौकशी नंबर बंद केल्याने त्याचा मोठा फटका रेल्वे प्रवाशांना बसला आहे. मात्र, मोठ्या प्रमाणात पुन्हा स्थानकात चौकशी नंबर सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.