कर्जत : शनिवारी प्रचार करण्याचा कालावधी संपता-संपता पावसाने सुरुवात केली, तो अजून थांबला नाही. असाच पाऊस सोमवारपर्यंत सुरू राहिला तर मतदान किती होईल? या चिंतेत उमेदवार आहेत. त्यामुळे त्यांच्या उरात धडकी भरली आहे.
शनिवारी प्रचाराचा शेवटचा दिवस होता आणि ५ वाजता पावसाची रिपरिप सुरू झाली ती रविवारी सायंकाळपर्यंत सुरूच होती. सोमवारी मतदानाचा दिवस आहे. त्यातच रात्रीचा ‘छुपा’ प्रचार काही ठिकाणी होईल. मात्र, पावसामुळे त्यांना व्यत्यय येईल. उद्या कार्यकर्ते पक्षाचे बुथ ठिकठिकाणी उभारतील. पाऊस पडत राहिला तर त्यांचीही अडचण होईल. पाऊस असल्यास मतदारसुद्धा मतदान करण्यासाठी स्वेच्छेने बाहेर पडणार नाहीत त्याचा फटका मतदानाच्या सरासरीवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे उमेदवार अस्वस्थ असून मतदान कमी होण्याच्या भीतीने उरात धडकी भरेल.