शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंचीही पंकजा मुंडेंना साथ; दसरा मेळाव्याला हजर राहण्याची घोषणा करत म्हणाले...
2
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
3
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान
4
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!
5
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
6
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
7
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
8
१२० मिनिटांचा थरार, समोर होता मृत्यू, पण वैमानिकानं दाखवलं प्रसंगावधान, असं उतरवलं विमान 
9
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
10
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
11
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
12
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
13
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
14
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
15
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
16
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
17
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
18
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
19
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
20
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी

जिल्ह्यात पावसाचा कहर सुरुच

By admin | Published: September 25, 2016 4:14 AM

सतत सुरू असलेल्या धुव्वाधार पावसाचा मोठा फटका अलिबाग व पेण तालुक्यांतील ११ गावांना बसला असून सखल भागातील घरांमध्ये पूराचे पाणी घुसले आहे. अलिबाग तालुक्यातील

अलिबाग : सतत सुरू असलेल्या धुव्वाधार पावसाचा मोठा फटका अलिबाग व पेण तालुक्यांतील ११ गावांना बसला असून सखल भागातील घरांमध्ये पूराचे पाणी घुसले आहे. अलिबाग तालुक्यातील चरी, ताडवागळे, पेझारी, देहेन, भाकरवड, कोळघर, वाघोडे तर पेण तालुक्यातील पाटणी व पांडापूर या गावांचा यामध्ये समावेश असल्याची माहिती रायगड जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरणाचे प्रमुख तथा रायगडचे निवासी उप जिल्हाधिकारी किरण पाणबुडे यांनी ‘लोकमत’ला दिली. सर्व गावांतील नुकसानीचे पंचनामे सध्या सुरु असून ते प्राप्त झाल्यावर नेमक्या किती घरातील किती कुटूंबाचे नेमके किती आर्थिक नुकसान झाले आहे, या बाबत माहिती स्पष्ट होईल, असेही पाणबुडे यांनी पुढे सांगीतले.पोलादपूर : तालुक्यातील ओंबळी येथे दरड कोसळल्याने १० घरे, १ विहिर व १ प्रवासी निवारा शेडचे लाखोंचे नुकसान झाले आहे. कोतवाल खुर्द व कोतवाल बुद्रुक येथे नळपाणी पुरवठा करणाऱ्या ५ विहिरींची पडझड झाली आहे. तर २ घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. बस प्रवासी निवारा शेडचे सुमारे २ लाख रुपयांचे नुकसान झाले. तर येथील नळपाणी पुरवठा करणारी एक कोसळली असून लाखो रुपयांची नुकसान झाले आहे. चरी गावांतील डिजिटल जि.प.शाळेसह सुमारे ६० घरांचे नुकसानशुक्रवार रात्रीच्या धुव्वाधार पावसाने अलिबाग तालुक्यांतील चरी गावास मोठा तडाखा दिली असून या गावातील डिजिटल जि.प.शाळेत पुराचे पाणी घुसल्याने सुमारे ६० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती शाळा व्यवस्थापन समीतीच्या अध्यक्षा विजया देविदास भगत व सदस्य सुधीर जाधव यांनी दिली आहे. गावांतील सुमारे ६० घरांमध्ये पुराचे पाणी घुसल्याने मोठे नुकसान झाले आहे.ताडवागळे व वाघोडेमध्ये भातशेतीची मोठी हानीताडवागळे व वाघोडे ग्रामपंचायत हद्दीमधील अनेक घरामध्ये पाणी जाऊ न मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोळघर येथील बंधाऱ्याचे कठडे वाहून गेले असून आजुबाजूच्या शेतात पाणी गेल्याने परिसरातील शेकडो हेक्टर भात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.जलशोषण क्षमता कमी झाल्याने जमीन खचण्यास सुरुवातगेल्या ७२ तासांपासून पावसाच्या कहराने गेल्या २४ तासात रुद्रावतार धारण केला आहे. सततच्या पावसाने आता जमीनीतील जलशोषण क्षमता कमी होवू लागली असल्याने रस्ता खचणे, दरडीची माती ढासळणे, गावांगावात रस्त्यावर पाणी साचून राहाणे आणि त्यातच पाऊस कोसळतच असल््याने सखल भागांतील घरांमध्ये पाणी घुसून नुकसान होण्यास सुरुवात झाली आहे. पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याचे तहसिलदारांचे आश्वासनदेहेन, भाकरवड, कोळघर, वाघोडे या भागात पुराने हाहाकार उडविल्याचे वृत्त समजताच रायगड जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम समिती सभापती चित्रा पाटील, आस्वाद पाटील यांनी अलिबाग तहसिलदार यांचेशी संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला व नुकसानीचे पंचनामे करणेचे निर्देश दिले. अलिबागचे तहसिलदार प्रकाश संकपाळ यांनी नुकसान भरपाईने देण्यात येणार असल्याची माहिती दिले.