शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

पेण तालुक्यात पावसाने भाताचे पीक जमीनदोस्त; शेतकरी चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2020 12:12 AM

वादळी वाऱ्याचा फटका; शासनाकडून नुकसान भरपाईची मागणी

पेण : खरीप हंगाम संपत आला असताना अंतिम चरणातील उत्तरा आणि हस्त नक्षत्रात पडलेल्या वादळी वाºयासह जोरदार पावसाने संपूर्ण भातशेती आडवी झाली असून, काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वर्षाकाठी जिरायती भातशेतीच मोठे आर्थिक नुकसान डोळ्यासमोर दिसत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. या नुकसानीची कशी भरपाई करून मिळणार, यासाठी शासनाने मदतीचा हात द्यावा, अशी पेणमधील शेतकºयांची मागणी आहे.पेण तालुक्यातील १८४ महसुली गावांमधील १३ हजार १०० हेक्टर क्षेत्रापैकी १२ हजार ८०० हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे. २२ मार्च, २०२०पासून देशात कोरोना संसर्गाची लागण व शासनाने जाहीर केलेल्या लाकडाऊनमुळे ग्रामीण भागातील नागरिक शेतीकडे वळले. प्रारंभीची पावसाची नक्षत्र खरीप हंगामात अनुकूल ठरली होती.त्यानंतर भातशेती बहरली १०० दिवसांची गरवी पिके जोमात आली. त्या बरोबरीने १२० दिवसांची हळवी पिकेही त्याच पद्धतीने जोमदार निपजली असताना, उत्तरा नक्षत्रच्या पंधरा दिवसांच्या संततधार पावसामुळे भात पिकांवर करप्या रोगाचा प्रादुर्भाव झाला. यामध्ये खारभूमी क्षेत्रात शेतीची मोठे नुकसान झाले. त्यानंतर, हस्त नक्षत्रात ३ आॅक्टोबर रोजी प्रचंड मेघगर्जनेसह वादळी वाºयासह पाऊस पडून संपूर्ण तयार झालेल्या भाताची पिके जमीनदोस्त केली आहेत. यामध्ये मोठं आर्थिक नुकसान होऊन शेतकरी बांधवांमधे नैराश्य पसरलं आहे. कोरोना महामारीत शेतीच्या वर्षाकाठी एकदाच येणाºया उत्पन्नावर शेतकरी बांधवांची भिस्त होती.नैसर्गिक आपत्तीचे संकटगतवर्षीप्रमाणे पावसाने या वर्षीही शेतकºयांच्या पदरात पडणाºया शेती उत्पादनावर असे नैसर्गिक आपत्तीच संकट उभे केल्याने आता मिळणाºया तुटपुंज्या उत्पन्नावर समाधान मानावे लागणार आहे. ओढावलेल्या या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी शासनाने शेतकरी संकटात सापडला असल्याने मदतीचाहात द्यावा, अशी पेणमधील शेतकºयांची मागणी आहे.