- गिरीश गोरेगावकरमाणगाव - माणगाव तालुक्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून अवकाळी पाऊस चालू होता. त्यातच मंगळवारी दुपारनंतर अचानक विजांच्या कडकडाटासह आलेल्या चक्रिवादळाने लोणेरे व गोरेगाव परिसरात मोठा धुमाकूळ घातला. यात अनेक शेतकऱ्यांच्या भातशेतीचे नुकसान झाले. ऐन दिवाळीच्या सुरुवातीला झालेल्या नुकसानामुळे शेतकरी चिंतेत आहेत, तर अनेक घरांची छपरे उडून गेली, काही घरांवर झाडे पडली यामुळे घराचे छप्परच राहिले नाही. तसेच ऐन दिवाळीत व्यावसायिकांनी थाटलेली दुकाने मोडावी लागली.हाता-तोंडाशी आलेले पीक कापणी करून शेतात पडलेले, तर काहींची कापणी सुरू असताना अवकाळी पाऊस आला. विजांच्या लखलखाटासह कोसळणाºया पावसाने अवघ्या दोन तासांत शेतीचे मोठे नुकसान केले. आधीच पावसाने ओढ दिल्याने भातउत्पादक चिंतेत असताना भातशेतीचे नुकसान झाले आहे. तर काही शेतकºयांनी कडधान्य बियाणे नुकतेच रोवले होते. लोणेरे व गोरेगाव परिसरात अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.शासनाने आता तरी नुकसानाची पाहणी करून माणगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे. सायंकाळी ४ ते ६ दरम्यान वादळी वाºयासह पावसाने जोरदार हजेरी लावली, दोन तास पडलेल्या पावसामुळे शिवारात उभे असलेले; पण कापणीला आलेल्या लोंब्याचे भात पडले. कापून ठेवलेल्या भाताचे अधिक नुकसान झाले. तसेच रात्रीपर्यंत माणगाव तालुका अंधारात होता.अचानक आलेल्या या वादळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. पावसाचा जोर इतका होता की, ओढ्याच्या खाचरात पाणी शिरल्याने कापलेले भात वाहून गेल्याचे लोणेरेतील शेतकरी प्रवीण टेंबे यांनी सांगितले.भाताची कापणी, झोडपणी ही पुढील कामे पूर्ण करायला मजुरांची संख्या वाढली. भात पिकाचे इतके नुकसान झाले की मजुरी द्यायलादेखील परवडणार नाही, कृषी व महसूल विभागाने तातडीने पंचनामे करून अहवाल शासनाला सादर करावा. पाऊस पडल्याने भाताच्या वावरात असे पाणी साचले होते, त्यातून भातपीक बाहेर काढून कसे वाळवायचे, या विवंचनेत असल्याचे शिवाजी टेंबे या शेतकºयांनी सांगितले.एकीकडे भात कापणी सुरू असतानाच, दुसरीकडे भात झोडपून धान्याची रास लावली; पण भाताची रास पाण्यात गेली आता वर्षभर खायचे काय, असा प्रश्न माणगाव तालुक्यातील शेतकºयांना पडला आहे. यंदा पावसाने बळीराजावर आस्मानी संकट धाडले आहे, असे प्रदीप शिर्के यांनी सांगितले.पावसामुळे हाती आलेल्या भाताच्या पिकाचे शेतातच भाताचे दाणे गळून पडणे, भात लाल पडणे, गिरणीत भरडायला घेऊन गेल्यावर भाताचा तुकडा पडणे आदी समस्या या अवकाळी पावसामुळे निर्माण झाल्या आहेत. त्यातच पेंढा भिजल्यामुळे शेतकºयांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. हा पेंढा शेतकरी वर्षभर साठवून जनावरांसाठी पुरवत असतो. अवकाळी पावसामुळे भाताचा पेंढा भिजल्यामुळे जनावरांच्या खाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.पाच लाख रुपयांहून अधिक नुकसानगोरेगाव, लोणेरे विभागात एकूण घर व वाडे नुकसानाचे १०० पंचनामे झाले असून, सुमारे पाच लाख रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे, तर शेती नुकसानाची आकडेवारी अद्याप मिळाली नाही.चक्रिवादळाने घरांचे फार नुकसान झाले आहे, त्याचा पंचनामा करण्याचे आदेश तलाठी व सर्कल यांना दिले आहेत. अहवाल लवकरच जिल्ह्याला पाठवण्यात येईल व लवकरच नुकसानभरपाई देण्याचे प्रयत्न करू.- बाबासाहेब भाबड, नायब तहसीलदार, माणगावनुकसानग्रस्त शेतक-यांच्या शेतीचा पंचनामा दोन दिवसांत पूर्ण करण्यात येईल. तसा अहवाल तत्काळ जिल्हाधिकाºयांना पाठवण्यात येईल.- पी. बी. नवले, तालुका कृषी अधिकारी, माणगाव
अवकाळी पावसाने पेण एसटी स्थानकात पाणीपेण : रविवारपासून सुरू असलेल्या पावसाने पेण एसटी स्थानकाला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते, यामुळे दिवाळीच्या सुट्टीला जाणाऱ्या प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले.पेण एसटी स्थानकाच्या नूतनीकरणाचे घोंगडे अनेक वर्षांपासून भिजत पडले असून, पावसाळा जवळ आला की, तात्पुरती डागडुजी करून मुलामा देण्याचे काम करण्यात येते. स्थानकातील पाणपोईमध्ये पाणीच नसून टाकी नुसती नावालाच लावली आहे. या स्थानकात पावसाचे पाणी जाण्यासाठी निमुळते गटार असल्यामुळे थोडा जरी पाऊस पडला तर स्थानकात पाणी जमू लागते. यामुळे विशेषत: मुंबई, ठाणे या स्थानकांवर उभे राहण्यासाठी प्रवाशांना जागा नसते, त्यामुळे पाण्यातून, चिखलातून वाट काढत प्रवाशांना एसटीपर्यंत पोहोचावे लागते.एसटी स्थानक धोकादायक झाले असून, अनेक वेळा वाहतूक निरीक्षक केबिनसमोरील स्लॅब पडला आहे. वाहक-चालक यांना थांबण्यासाठी असलेली रूम गळक्या अवस्थेत असून, पावसाळ्यात नेहमी अशा तुटक्या खोलीचा आसरा त्यांना घ्यावा लागतो. पनवेलकडे जाणाºया विनावाहक एसटीतून जाणाºया प्रवाशांच्या नोंदीसाठी जी शेड ठेवण्यात आली आहे. त्या शेडवर बंद असलेल्या पंख्यावरून विद्युत कनेक्शनची वायर सोडली आहे. भविष्यात या ठिकाणी शॉर्टसर्किट झाल्यास पूर्ण लोखंडी शेडला करंट लागून मनुष्यहानी होऊ शकते.अशा अनेक गोष्टींकडे अधिकारी वर्गाचे तसेच एसटी प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असून, एखादी मोठी दुर्घटना झाल्यावरच एसटी प्रशासनाला जागा येईल का? या गोष्टीकडे संबंधित अधिकारी लक्ष देतील का? असा सवाल प्रवासी विचारत आहेत.