- मधुकर ठाकूर
उरण - उरण परिसरात काही ठिकाणी गुरुवारी सकाळपासूनच कोसळणाऱ्या मुसळधार परतीच्या पावसाने उरणकरांना अगदी झोडपून काढले आहे.काही ठिकाणच्या रस्त्यांवर पाणी साचले होते.
मागील काही दिवसांपासून उरणकरांना ऑक्टोबर हीटची जाणीव होऊ लागली होती.उष्म्याने घामाघूम झालेल्या उरणकरांना गुरुवारी कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने थोडासा दिलासा दिला आहे. सकाळपासुनच परिसरात पावसाची लक्षणे दिसू लागली होती.त्यानंतर ढगांच्या गडगडाटाने पावसाला सुरुवात झाली.गुरुवारी सकाळी १०.३० ते १२.१५ या दरम्यान काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मध्यम पाऊस झाला.जोरदार पडलेल्या पावसामुळे परिसरातील काही ठिकाणच्या रस्त्यांवर पाणी साचले होते.तर काही ठिकाणी नालेही वाहु लागले होते.तर काही ठिकाणी पावसाची रिपरिप सुरू होती.