शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

रायगड जिल्ह्यात पावसाचे धूमशान  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 2:13 AM

रायगड जिल्ह्याचे एकूण सर्वसाधारण पर्जन्यमान ५० हजार २८२ मि.मी. आहे. मंगळवारी सकाळी ८ वाजता या सर्वसाधारण पर्जन्यापैकी ५१.६७ टक्के म्हणजे २५ हजार ९७९ मि.मी. पर्जन्यमान ९ जुलै रोजी पूर्ण झाले आहे.

अलिबाग - जिल्ह्याचे एकूण सर्वसाधारण पर्जन्यमान ५० हजार २८२ मि.मी. आहे. मंगळवारी सकाळी ८ वाजता या सर्वसाधारण पर्जन्यापैकी ५१.६७ टक्के म्हणजे २५ हजार ९७९ मि.मी. पर्जन्यमान ९ जुलै रोजी पूर्ण झाले आहे. गतवर्षी याच दिवशी १९ हजार १५६ मि.मी. पाऊस झाला होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदा अल्पावधीत अधिक पर्जन्यमान झाले आहे.पावसाचा जोर अद्याप कमी झालेला नाही. २४ तासांत जिल्ह्यात सर्वाधिक १९५ मि.मी. पावसाची नोंद रोहा येथे झाली आहे. जिल्ह्यात उर्वरित ठिकाणी मुरुड-७३, तळा-१४५, माणगाव-१८३, श्रीवर्धन-१२, महाड-१८६, अलिबाग-१०४, पोलादपूर-८१, पेण-८०, कर्जत-१४१, खालापूर-११८, उरण-१८८, पनवेल-१८०, सुधागड-८७, म्हसळा-६१ तर गिरिस्थान माथेरान येथे १४४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. या २४ तासांतील जिल्ह्यातील सरासरी पर्जन्यमान १२३ मि.मी. झाले आहे.नागोठणे ठप्पच; संततधार सुरूच1नागोठणे : पावसाचे थैमान चालूच असल्याने सलग चौथ्या दिवशी शहरात पुराचे पाणी भरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. एसटी बसस्थानक, कोळीवाडा, मटण मार्केट, लेक व्ह्यू हॉटेल भागात पुराचे पाणी भरले आहे. एसटी बसस्थानकात दोन फूट पाणी असल्याने एसटी बसची महामार्गावरून वाहतूक सुरू करण्यात आली आहे. पाटबंधारे खात्याकडून धरणाचे पाणी सोडण्यात येणार असल्याबाबत विचारणा केली असता, सायंकाळी ५ पर्यंत अशा प्रकारचा कोणताही अधिकृत संदेश आला नसल्याचे महसूल विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.उरणमध्ये इंटरनेट सेवा ठप्प2उरण : मुसळधार पावसामुळे एमटीएनएलचे उरण टेलिफोन एक्सचेंजमध्ये बिघाड झाल्याने उरण, जेएनपीटी, शेवा, एनएएडी आदी परिसरातील इंटरनेट सेवा पाचव्या दिवशीही सुरळीत झालेली नाही. परिणामी, सुमारे तीन ग्राहकांना त्याचा फटका बसला आहे. उरण परिसरात मागील पाच दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. पावसामुळे शहर व ग्रामीण भागातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे उरण टेलिफोन एक्सचेंजमध्ये बिघाड झाल्याने परिसरातील इंटरनेट सेवा मागील पाच दिवसांपासून ठप्प झाली आहे. परिणामी, व्यापारी, बँका, ग्राहक सेवेवर त्याचा विपरित परिणाम झाला आहे. बिघाड दूर करण्यासाठी तंत्रज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. मात्र, मुसळधार पावसामुळे एक्सचेंजमधील ओएफएस बिघाड दूर करण्यात अडचणी येत असल्याची माहिती उरण टेलिफोन एक्सचेंजचे विभागीय व्यवस्थापक पी. जी. बळकटे यांनी दिली. व्यापारी, बँका, ग्राहक सेवेवर त्याचा विपरित परिणाम झाला असल्याने उरण टेलिफोन एक्सचेंजच्या गलथान कारभाराविरोधात नागरिक, ग्राहकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.विमानतळबाधित गावांत शिरले पाणीपनवेल : चार दिवसांपासून अविरत कोसळणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. गेल्या २४ तासांत पनवेल परिसरात तब्बल १८0 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. विमानतळबाधित पारगाव आणि डुंगी या गावांत मंगळवारी पुन्हा पाणी शिरल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी भरपावसात राज्य महामार्गावर रास्ता रोको केला.पनवेल शहरासह संपूर्ण तालुक्यात सलग चौथ्या दिवशी पावसाचा कहर कायम होता. तालुक्यातील गाढी, कासाडी या नद्या दुथडी वाहत होत्या, तसेच शहरातील सर्व नालेदेखील ओसंडून वाहत आहेत. ग्रामीण भागातदेखील हीच अवस्था आहे. अनेक गावांना जोडणारे रस्ते, लहान पूल पाण्याखाली गेल्याने गावांचा संपर्क तुटला आहे. नांदगाव, उमरोली, बारापाडा, डोलघर, तुर्भे, करवले आदी गावांचा यामध्ये समावेश आहे. सायन-पनवेल महामार्गावर ठिकठिकाणी पाणी साचले होते. त्यामुळे वाहतूक धिमी झाली होती. पनवेल महापालिका क्षेत्रातील नागझरी गावात अतिवृष्टीमुळे शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे ग्रामस्थांना तातडीने नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी स्थानिक नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी केली आहे. शहरातील मैदाने, उद्यानांना जणू गार्डनचे स्वरूप प्राप्त झाले आहे. कळंबोली, खारघर, तसेच पनवेल शहरातील काही भागात या वेळी पाणी साचल्याने नागरिकांचे हाल झाले.\

 

टॅग्स :RainपाऊसRaigadरायगड