रायगड जिल्ह्याच्या काही भागांत पावसाच्या सरी; ऑरेंज अलर्ट जारी

By राजेश भोस्तेकर | Published: September 13, 2022 10:22 AM2022-09-13T10:22:22+5:302022-09-13T10:58:56+5:30

रायगड जिल्ह्यात गेले दोन दिवस पावसाचे आगमन होत आहे. सोमवारी जिल्ह्यात पावसाने सायंकाळ पासून सुरुवात केली होती

Rain showers in some parts of Raigad district | रायगड जिल्ह्याच्या काही भागांत पावसाच्या सरी; ऑरेंज अलर्ट जारी

रायगड जिल्ह्याच्या काही भागांत पावसाच्या सरी; ऑरेंज अलर्ट जारी

Next

अलिबाग : रायगड जिल्ह्याच्या काही भागात पावसाच्या जोरदार तर काही ठिकाणी मध्यम सरी कोसळत आहेत, कोलाड, माणगाव, इंदापूर, नागोठणे, रोहा, उरण पेण भागात पावसाचा जोर अधिक आहे. या पावसाने महामार्गावरील वाहतूक मंदावली आहे. अलिबाग, मुरुड या किनारपट्टीच्या भागात पाऊस किरकोळ स्वरूपाचा आहे. जिल्ह्याच्या सर्वच भागात दाट ढगाळ वातावरण आहे. हवामान खात्याने रायगड जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे प्रशासनाने  सतर्कतेच्या सूचना दिल्यात. आजच्या साखरचौथ गणेशोत्सवावर पावसाचे सावट आहे.

रायगड जिल्ह्यात गेले दोन दिवस पावसाचे आगमन होत आहे. सोमवारी जिल्ह्यात पावसाने सायंकाळ पासून सुरुवात केली होती. त्यामुळे साखर चौथ गणरायाची आगमन मिरवणूक गणेश भक्तांना पावसात साजरी करावी लागली. सलग दोन दिवस पडत असलेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. आज सकाळ पासून पावसाने पुन्हा सुरुवात केली आहे. काही भागात पावसाच्या तुरळक सरी पडत असून काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे.
 

Web Title: Rain showers in some parts of Raigad district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.