शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

Rain: मुंबापुरीत कोसळधारा; वरळी हिल रोडवर टेकडीवरील दगड, माती कोसळली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2020 2:29 AM

मुंबई शहर आणि उपनगरात शुक्रवारी दिवसभर पावसाने धिंगाणा घातला असतानाच आता ४ जुलै रोजीही पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नाशिकसह पुणे जिल्ह्यासाठीही रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुंबई : देशासह महाराष्ट्राला व्यापलेल्या मान्सूनने मुंबईकडे पाठ फिरवली होती. मात्र त्यानंतर शुक्रवारी दिवसभर कोसळलेल्या पावसाने मुंबईला भिजवले. दुपारी १ नंतर मात्र पावसाचा जोर ओसरला.

पावसामुळे मुंबईत वाहतूक मंदावली. ३८ ठिकाणी पाणी साचल्याचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण पडवळ यांनी सांगितले. तर, अंधेरी सबवेमध्ये पाणी साचल्याने तो काही काळ बंद करून वाहतूक वळवल्याची माहिती उपआयुक्त संदीप भाजीभाकरे यांनी दिली.२४ ठिकाणी झाडे कोसळली,

सायंकाळी साडेपाचपर्यंतच्या नोंदीनुसार, कुलाबा येथे १६०.६ तर सांताक्रुझ येथे १०२.७ मिली. पाऊस झाला. सकाळी ८ ते १० या वेळेत समुद्राला भरती होती. या वेळी ४.४१ मीटर उंच लाटा उसळल्या. परिणामी हिंदमाता, कफ परेड, धोबीघाट, भुलाभाई देसाई रोड, बिंदु माधव जंक्शन, चिराबाजार, भायखळा पोलीस ठाणे, ई. मर्चंट रोड, सायन रोड नंबर २४, गांधी मार्केट, अंधेरी सब वे येथे पाणी साचले. ३ ठिकाणी बांधकामाचा भाग पडला. २४ ठिकाणी झाडे पडली. ९ ठिकाणी शॉर्टसर्किट झाले. वरळी हिल रोड येथे जरीमरी मंदिराजवळ टेकडीवरील मातीचा काही भाग, दगड खाली कोसळले. सुदैवाने हानी झाली नाही. 'मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, पुण्याला आज रेड अलर्टमुंबई शहर आणि उपनगरात शुक्रवारी दिवसभर पावसाने धिंगाणा घातला असतानाच आता ४ जुलै रोजीही पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नाशिकसह पुणे जिल्ह्यासाठीही रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. येथे अत्यंत मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला. तर ५ आणि ६ जुलै रोजी पालघरला आॅरेंज अलर्ट (कोणत्याही क्षणी नैसर्गिक आपत्ती येऊ शकते) असून, येथे तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडेल.५ ते ६ जुलैदरम्यान मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पावसाचा मारा सुरूच राहील, अशी शक्यताही हवामान खात्याने वर्तविली आहे. मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले की, भारतीय हवामान शास्त्र विभागाने शनिवारीही मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. यात मुंबईसह पश्चिम किनारपट्टीचा समावेश आहे.मशीद रेल्वे स्थानकावरील रूळ पाण्याखालीमुसळधार पावसामुळे रेल्वे रुळाजवळील नाल्यामधून पाणी वाहण्यास अडथळा आला. पाण्याचा निचरा न झाल्याने मध्य रेल्वे मार्गावरील मशीद स्थानकावरील रुळांवर सकाळी ११ च्या सुमारास पाणी साचले. परिणामी, काही काळ रेल्वे सेवा विस्कळीत झाली. मुसळधार पावसामुळे हार्बर मार्गावरील लोकल फेऱ्या १० ते १५ मिनिटांनी धावत होत्या. पनवेलकडे जाणारी लोकल मशीद स्थानकात थांबली होती. दरम्यान, लोकल सेवा सुरळीत करण्यासाठी वडाळा येथून विशेष लोकल सोडण्यात आली.बसचा मार्ग बदललासकाळी १० ते ११ या वेळेत मलबार हिल, दादर, भायखळा, हाजी अली, सांताक्रुझ, विलेपार्ले, पवई, घाटकोपर, कुर्ला, साकीनाका, वांद्रे, अंधेरी, सांताक्रूझ, बोरीवली, गोरेगाव येथे पावसाचा जोर वाढला. वरळी नाका, हिंदमाता, धोबीघाट, चिराबाझार यासह अनेक ठिकाणी पाणी साचल्याने बेस्ट बसची वाहतूक वळविण्यात आली होती.वातावरण धूसरसकाळी ८ वाजल्यापासून दुपारी १२ वाजेपर्यंत मुंबईवर दाटून आलेल्या ढगांमुळे काळोख झाला होता. शिवाय मुसळधार पाऊस कोसळत होता. त्यामुळे मुंबईतील वातावरण धूसर झाल्याचे चित्र होते.

टॅग्स :Rainपाऊस